मतापूरते पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करून काँग्रेसचा दुष्काळी जनतेच्या भावनेशी खेळ- प्रदीप खांडेकर*

 *मतापूरते पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करून काँग्रेसचा  दुष्काळी जनतेच्या भावनेशी खेळ- प्रदीप खांडेकर*



मंगळवेढा/प्रतिनिधी

सध्या दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असून पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे अशा परिस्थितीमध्ये आमदार समाधान आवताडे यांनी ज्या गावात पाण्याची टंचाई आहे अशा गावातील ग्रामपंचायत ला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देत प्रस्ताव आल्यानंतर तात्काळ त्या गावात टँकर सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत मात्र नुकत्याच लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहित्यामुळे कागदी घोडे नाचविण्याचे खेळ न पाहता काँग्रेसने मतदानाअगोदर ना 'प्रस्ताव ना कागद' थेट तालुक्याच्या दक्षिण भागामध्ये गावोगावी पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करून आम्ही लोकांप्रती किती संवेदनशील आहोत हे दाखवून दिले होते, पण मतदान होताच काँग्रेसने सुरू केलेले पाण्याचे टँकर सर्रास गावातून बंद करत केवळ मते मिळवण्यापुरतेच आमदार प्रणिती शिंदे व काँग्रेसने टँकर सुरू करण्याचा स्टंट केला की काय? अशी चर्चा आता गावागावातील भोळ्याभाबड्या जनतेतून होऊ लागली असून काँग्रेसने लोकसभेला मते मिळवण्यापूरते पाण्याचे टँकर सुरू करून जनतेच्या भावनेशी खेळ केला असल्याचे मत जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व माजी सभापती प्रदीप खांडेकर यांनी व्यक्त केले आहे.




यावेळी बोलताना खांडेकर म्हणाले की,सध्या मंगळवेढा तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे अशा परिस्थितीमध्ये निवडणूक जाहीर होताच मतदारसंघाकडे ढुंकूनही न पाहणारे अनेकजण न केल्याच्या कामाचेही श्रेय घेण्यासाठी पुढे आले होते अनेकजणांनी म्हैसाळचे पाणी,टेंम्भूचे पाणी 24 गावचा प्रश्न मीच सोडवला म्हणूनही उर बडवून घेतल्याचे या मतदारसंघातील जनतेने पाहिले आहे तर आचारसंहिता असतानाही या मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधींने दिवसरात्र जनतेच्या हितासाठी,मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्न करत वारंवार जिल्हाधिकारी व प्रशासनाला विनंती करून नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी उपाययोजना करा टँकरचे प्रस्ताव तात्काळ मंजूर करा अशी विनंती करत भोसे प्रादेशिक योजनेसाठी सुमारे तीस लाखाचा निधी मंजूर करून घेत योजना सुरू ठेवण्यासाठी धडपड करून लोकांना गैरसोय होणार नाही याबाबत वारंवार पाठपुरावा केला तर काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी निवडणुकीपूरते  मतदारसंघात येऊन मोठमोठ्या वल्गना करत तालुक्यातील भोळाभाबडा मतदार आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न करायचा व निवडणूक संपली की आपला पसारा आवरून निघून जायचं हा प्रकार केला असून निवडणुकीपुरतं स्वखर्चातून टँकर सुरू करत लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला हे या सामान्य गोरगरीब जनतेच्या लक्षात आलं असून त्यांच्या भुलभुलैय्याना बळी पडलेली जनता सध्या डोक्यावर हात मारून घेत आहे मतदान संपताच टँकर बंद करून मतापुरती केलेली स्टंटबाजी लोकांच्या लक्षात आली असून आगामी निवडणुकीत कोणत्या तोंडाने मतं मागणार हा सवाल मतदार विचारल्याशिवाय राहणार नाहीत असेही माझे सभापती प्रदीप खांडेकर यांनी बोलताना सांगितले



 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.