*पंढरपूर सिंहगडच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागात कार्यशाळा संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोर्टी, पंढरपूर मधील स्थापत्य अभियांत्रिकी विभागात दिनांक २० मे २०२४ ते २४ मे २०२४ या कालावधीत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. हि कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
ही कार्यशाळा आय आय आर एस इसरो मार्फत आयोजित करण्यात आली होती. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर हे आय आय आर एस इसरो चे नोडल सेंटर आहे . या नोडल सेंटरद्वारे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील शिक्षकांनी सहभाग नोंदवला. ही कार्यशाळा एप्लीकेशन ऑफ जिओ स्पेशियल टेक्नॉलॉजी इन पॅलिओ चैनल स्टडीज या विषयावर आयोजित करण्यात आली होती. ही कार्यशाळा यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, विभाग प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. चेतन पिसे (डीन रिसर्च अँड डेव्हलपमेंट), नोडल सेंटर प्रमुख डॉ. गणेश बिराजदार, प्रा. मिलिंद तोंडसे (समन्वयक) तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षेकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.