स्वेरीत ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवसा’च्या निमित्त कार्यशाळा संपन्न मेसा आणि आयआयसी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन

                                                                                        

स्वेरीत ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवसा’च्या निमित्त कार्यशाळा संपन्न


मेसा आणि आयआयसी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन



पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या ‘मेसा’ अर्थात मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडन्टस असोसिएशन आणि ‘आयआयसी’ अर्थात इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवसा’च्या निमित्ताने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला विद्यार्थी व प्राध्यापकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.

               स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवसा’च्या निमित्ताने आयोजिलेल्या या कार्यशाळेत डॉ.एन.यु.कौटकर हे प्रमुख मार्गदर्शन करत होते. प्रास्तविकात मेसाचे समन्वयक प्रा. संजय मोरे यांनी कार्यशाळेचा हेतू स्पष्ट केला. पुढे माहिती देताना डॉ.कौटकर म्हणाले की, ‘भारतात दरवर्षी ११ मे रोजी ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस’ साजरा केला जातो. हा दिवस भारताच्या तांत्रिक प्रगती आणि यशाचे स्मरण करून देतो. दि.११ मे, १९९८ रोजी भारताने राजस्थानमधील भारतीय सैन्याच्या पोखरण चाचणी रेंजवर शक्ती-१ या अणु क्षेपणास्त्राची पहिली यशस्वी चाचणी घेतली. ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाचे महत्त्व अणुचाचण्यांच्या पलीकडे भारताच्या तांत्रिक पराक्रमाची आणि विविध क्षेत्रांतील नवकल्पना साजरे करण्यासाठी आहे. भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगती आणि देशाच्या विकासासाठी भारतीय शास्त्रज्ञ, अभियंते आणि तंत्रज्ञांनी केलेल्या योगदानाचे स्मरण व्हावे म्हणून हा दिवस साजरा केला जातो. ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिना’निमित्त देशभरात विविध कार्यक्रम, परिसंवाद आणि परिषदा आयोजित केल्या जातात ज्यामुळे वैज्ञानिक वृत्ती आणि तांत्रिक नवकल्पनांना चालना मिळते. भारताच्या तांत्रिक प्रगतीत योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांच्या प्रयत्नांना ओळखण्याचा आणि त्यांचा सन्मान करण्याचा आणि तरुण पिढीला विज्ञान आणि तंत्रज्ञानात करिअर करण्यासाठी प्रेरित करण्याचा हा दिवस आहे. अलिकडच्या वर्षांत कृत्रिम बुद्धिमत्ता, जैवतंत्रज्ञान, अंतराळ संशोधन आणि माहिती तंत्रज्ञान यासारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानातील भारताच्या कामगिरीचे प्रदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवसाचा वापर केला जातो. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील भारताच्या प्रवासावर चिंतन करण्याचा आणि नाविन्यपूर्ण प्रगती आणि विकासाला चालना देणाऱ्या भविष्याची कल्पना करण्याचा हा दिवस आहे. यावेळी विभागप्रमुख डॉ. एस.बी. भोसले यांच्यासह महाविद्यालयातील इतर प्राध्यापक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. संजय मोरे मेसा समन्वयक यांनी केले तर आभार सुप्रिया शेलार यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad