अमेरिकेतील विद्यार्थिनींची स्वेरीला सदिच्छा भेट जाणून घेतली स्वेरीतील संशोधन विभागाची प्रगती


अमेरिकेतील विद्यार्थिनींची स्वेरीला सदिच्छा भेट


जाणून घेतली स्वेरीतील संशोधन विभागाची प्रगती



पंढरपूर- भारताचे थोर शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते स्वेरीमध्ये संशोधन विभागाची मुहूर्तमेढ रोवली गेली. तेंव्हापासून शिक्षणाबरोबरच संशोधन विभागात देखील स्वेरी चमकदार कामगिरी करत आहे त्यामुळे राज्य व देशभरातील शास्त्रज्ञांचे व शिक्षणतज्ञांचे लक्ष स्वेरीतील संशोधनावर लक्ष केंद्रित झाले आहे. स्वेरीच्या यशाचा चढता आलेख पाहून अनेक शिक्षणतज्ञ व संशोधक स्वेरीला आवर्जून भेट देत असतात. त्या अनुषंगाने अमेरिकेतील दोन विद्यार्थिनींनी नुकतीच स्वेरीला सदिच्छा भेट दिली आणि संशोधन विभागाची पाहणी केली. 

         गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या संशोधन विभागाला अमेरिकेत राहणाऱ्या व 'अमेरिकन नेहरू फुलब्राइटर्स स्कॉलर्स’ म्हणून भारतात पुणे येथे संशोधन करण्यासाठी आलेल्या अरुणा खारोड व अक्षाली गांधी या दोन विद्यार्थीनींनी भेट देवून संशोधन विभागाची सविस्तर माहिती जाणून घेतली. प्रथम अरुणा खारोड यांनी स्वेरीत येण्यामागचा हेतू स्पष्ट केला. यापूर्वी 'स्टडी ऑफ सोलार डिप्लॉयमेंट इन पंढरपूर’ या विषयावर स्वेरीमध्ये संशोधन करण्यासाठी ‘नेहरू पुलब्राईट यु.एस. स्टुडंट रिसर्च प्रोग्राम’ च्या माध्यमातून वर्जीनिया (वॉशिंग्टन, अमेरिका) मधील झॅकरी मरहंका हे आले असून त्यांचा संबंधित विषयाचा अभ्यास वर्तमानात सुरू आहे. मरहंका यांच्या माध्यमातून स्वेरीतील संशोधनाची झेप ही अरुणा खारोड व अक्षाली गांधी यांच्यापर्यंत पोहचली त्यामुळे त्यांना स्वेरीला भेट देण्याची इच्छा निर्माण झाली. प्रारंभी स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ.पी.एम.पवार यांनी अरुणा खारोड व अक्षाली गांधी या दोन्ही विद्यार्थिनींचे स्वागत केले. अरुणा खारोड ह्या सितार वादक आणि सितार निर्मितीवर संशोधन करत आहेत तर अक्षाली गांधी ह्या वाढत्या वाहनांमुळे रस्त्यावर वाढत जाणारी गर्दी या विषयाला अनुसरून ‘वाहतूक नियोजन' यावर संशोधन करत आहेत. अरुणा खारोड व अक्षाली गांधी यांनी कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे सर्व विभाग, संशोधन विभाग, विविध संशोधन सुविधा यांचे निरीक्षण करून माहिती जाणून घेतली. संशोधन प्रकल्प, परिसर, शिक्षण पद्धती, विद्यार्थ्यांमध्ये असलेली शिस्त व संस्कार, प्राध्यापक व विद्यार्थी यांच्यातील संवाद आदी बाबी पाहून त्या भारावून गेल्या. यावेळी स्वेरीचे संस्थापक सचिव आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, संशोधन आणि विकास विभागाचे अधिष्ठाता डॉ. ए.पी. केने व इतर प्राध्यापक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad