*पंढरपूर सिंहगड मध्ये "ऑटोमेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग" या विषयावर व्याख्यान*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये मंगळवार दिनांक ३० एप्रिल २०२४ रोजी डॉ. व्ही एस बिराादार यांचे व्याख्यान संपन्न झाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
व्याख्यानाच्या सुरुवातीस मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डाॅ. शाम कुलकर्णी यांनी डॉ. व्ही एस बिरादार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
यावेळेस पुढे बोलताना डॉ. बिरादार यांनी ऑटोमेशन म्हणजे काय? अभियांत्रिकी शिक्षणात असलेले ऑटोमेशन चे महत्व आणि कंट्रोल इंजिनिअरिंग याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले रूट लोकस मेथड त्या मेथड मध्ये असलेले सिस्टीम स्टॅबिलिटी आणि कंट्रोलर डिझाईन त्यांच्याशी असलेले संलग्न सर्व पॅरामीटर्स विद्यार्थ्यांना समजावून सांगितले कंट्रोल सिस्टीम जर ताब्यात नसेल तर अनेक प्रकारचे अपघात होऊ शकतात. त्यामुळे इंजिनीयरचा रोल कंट्रोल इंजिनिअरिंग मध्ये महत्त्वाचा आहे
हे व्याख्यान यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, प्रा. धनंजय गिराम आदींसह सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.