जनसामान्यांचा एकच निर्धार पुन्हा एकदा मोदी सरकार प्रणव परिचारक
पंढरपूर - प्रतिनिधी
प्रगतशील सोलापूरचे स्वप्न होतंय साकार जनतेच्या मनात पुन्हा एकदा मोदी सरकार - राम सातपुते
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील ओझेवाडी येथे श्री पंडितरावजी भोसले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान भोसले कुटूंबीयाने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी पंडितरावजी भोसले यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा करत विजयासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच अनवली गावाला भेट दिली असता अनवली गावचे सरपंच वल्लभजी घोडके यांनी समस्त गावकऱ्यांच्या वतीने स्वागत करत सत्कार केला. यावेळी वल्लभजी घोडके यांनी “संपूर्ण अनवली गाव आदरणीय मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी पाहण्यासाठी उत्सुक असून त्यासाठी आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत असा विश्वास दिला.“ या दरम्यान मोदीजींच्या नेतृत्वाचे कौतुक करत विदेशात आपल्या भारत देशाचे नाव मोदीजींमुळे उंचावले आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो अशा भावना विवीध गावातील ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. तसेच तावशी गावाला सदिच्छा भेट दिली. या गावचे वैशिट्य म्हणजे तावशी या गावाला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ गाव हा पुरस्कार प्रदान केला असून सर्व ग्रामस्थ मोदीजींना आपला आदर्श मानतात. यावेळी तावशी गावातील गणपतजी (पप्पू) यादव यांच्या निवासस्थानीही भेट दिली. या भेटीदरम्यान गणपतजी यादव यांनी समस्त तावशीकरांच्या वतीने माझे स्वागत करत लोकसभा विजयासाठी शुभेच्छा दिल्या. तावशी गावात अनेक विकासकामे झाली असून याचे श्रेय मोदी सरकारचे आहे आणि पुन्हा एकदा लाडक्या मोदीजींना पंतप्रधानपदी पाहण्यासाठी आम्ही सर्व जोमाने काम करू अशा भावना ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केल्या.
यादरम्यान युवा नेते प्रणवजी मालक परिचारक यांनी देशाचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचा सशक्त, समृद्ध आणि विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी सोलापुरातून कमळला मोठया मताधिक्याने विजयी करून आणण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करण्याचा निर्धार केला. तसेच आदरणीय मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी पाहण्यासाठी अहोरात्र काम करण्याचे आश्वसन दिले.
याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस शशिकांत नाना चव्हाण, भाजपा प्रभारी अक्षय वाडकर, हरिषदादा गायकवाड, राजश्रीताई भोसले, पंढरपूरचे उपसभापती सितारामभाऊ नागणे, सुभाष मस्के सर, सुनिलकाका भोसले, संतोष घोडके, बबन जाधव, किसना भुताडे, विनोद गायकवाड, गणेश पंडित, दीपक पंडित, हेमंत दाडगे, अनंत वाघ, बाळासो बुपनेर, हिरालाल रोख, सतीश घाडगे, दादा घाडगे, लक्ष्मण शिंदे, अर्जुन कोळी, समाधान जाधव, रामभाऊ दिघे, जयसिग भुसनर, संतोष भिंगारे, रामभाऊ गायकवाड, महादेव शिंदे, दिलीपभाऊ गुरव, बुवा शिंदे, सुदाम मोरे, अनिल दांडगे, अभिजित गुरव,नवनाथ बंगाळे, भास्कर मोरे, विजय मोरे, संजय माळी, अजित शिंदे, औदूंबर दिसले, विजय सरतापे, किसान मोर्चा भाजपा प्रदेश सदस्य विश्रांती भुसणर, शिवदास लाड, दत्ता लाड, दादा मोटे, रामभाऊ जाधव, रणजित जाधव, लक्ष्मण गोडसे सर, भास्करराव यादव, विजय शिराम, पुरुषोत्तम पवार, अभिजित यादव, नितीन लाड, श्रीनिवास जगदाळे तसेच ग्रामस्थ आणि युवा कार्यकर्ते उपस्थित होते.