पंढरपूर सिंहगडच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात पालक मेळावा उत्साहात*

 *पंढरपूर सिंहगडच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात पालक मेळावा उत्साहात*



पंढरपूर: प्रतिनिधी 


एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मधील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात सोमवार दिनांक २५ मार्च २०२४ रोजी आयोजित करण्यात आला होता. हा पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

   सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग आयोजित करण्यात आलेल्या पालक मेळाव्याचे उद्घाटन उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डाॅ. चेतन पिसे, सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम, पालक प्रतिनिधी दशरथ सांगोलकर आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने मेळाव्याची सुरुवात करण्यात आली.

 दरम्यान पालक प्रतिनिधी दशरथ सांगोलकर यांचे डाॅ. स्वानंद कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

  दरम्यान सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांनी विभागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आढावा उपस्थितीत पालकांसमोर सादर केला. उपस्थित पालकांसमोर उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.

  हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या मेळाव्याचे सुञसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. यशवंत पवार यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad