*बारावी सायन्स नंतर पुढे काय? या विषयावर व्याख्यान*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मधील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर यांनी बारावी सायन्स नंतर पुढे काय? शिक्षण घ्यायचे याविषयावर सांगोला येथील प्रा. मयुर महामुनी यांच्या सक्सेस क्लासेस मधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळेस डाॅ. समीर कटेकर बोलताना म्हणाले, बारावी ही विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनाची शेवटची अवस्था आहे. बारावीनंतर विद्यार्थ्याला मार्ग व करियर ठरवावे लागते. बरेच योजना आणि विचार करून हे पाऊल उचलले पाहिजे. बारावीनंतर काय करावे? हे बेफिकीरपणे निवडणे आपणास परवडणारे नाही. आपली कारकीर्द निवडताना आपण आपली आवडती गोष्टी, नोकरीची संधी आणि संधी इत्यादी बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत. १२ वी सायन्स नंतर इंजिनियरींग करायचीय? इंजिनियर कसे व्हायचे? इंजिनियरींग नंतर मला जॉब भेटेल का? इंजिनियरींग पुर्ण करायला मला किती खर्च येईल. हे अनेच प्रश्न पडतात? इंजिनियरींग करायचे हे खुप विदयार्थांचं स्वप्न असतं. बरेच विदयार्थी दहावी झाली की लगेच इंजिनियरींग प्रवेश परीक्षेच्या तयारीला लागतात. इंजिनिअरिंग ला प्रवेश घेताना महाविद्यालयाचे प्लेसमेंट, वार्षिक निकाल, इन्फ्रास्ट्रक्चर, सेवा सुविधा, सामंजस्य करार आदींसह अनेक गोष्टींचा बारकाईने अभ्यास करून काॅलेज निवडणे आवश्यक असल्याचे मत डॉ. समीर कटेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
हे व्याख्यान यशस्वी करण्यासाठी विशाल म्हेञे सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.