*पंढरपूर सिंहगड मध्ये "विंग्ज २ के २४" इव्हेंट उत्साहात संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये शनिवार दिनांक ६ मार्च २०२४ रोजी "विंग्ज २ के २४" या राष्ट्रीय स्तरावरील इव्हेंट चे आयोजन करण्यात आले होते. हा इव्हेंट मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या इव्हेंट चे उद्घाटन प्रमुख पाहुणे डाॅ. आर. बी. शेंडगे, स्वप्निल शेवाळे, प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. अतुल कुलकर्णी, प्रा. किशोर जाधव आदी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यादरम्यान प्रमुख पाहुणे डाॅ. आर. बी. शेंडगे, स्वप्निल शेवाळे यांचा महाविद्यालयाच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या "विंग्ज" या इव्हेंट मध्ये सर्व विभागात प्रोजेक्ट काॅम्पिंटेशन हि स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत इतर महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
या कार्यक्रमात महाविद्यालयाने आयोजित केल्या आंतरराष्ट्रीय "आदित्य २ के २४" या स्पर्धेतील सोलार प्रॉडक्ट अँड प्रोजेक्ट काॅम्पिंटेशन, इन्टरनॅशनल काॅनफरन्स, बिझनेस प्लॅन काॅम्पिंटेशन आणि सोलार ई-सायकल चॅम्पियनशिप या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेतील स्पर्धकांना रोख स्वरूपाचा धनादेश, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे डाॅ. आर. बी. शेंडगे, स्वप्निल शेवाळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी वरदा बिडकर व कुमार ऋतुराज बडवे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डाॅ. अतुल आराध्ये यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी वृंद परीश्रम घेत आहेत.