*पंढरपूर सिंहगड मधील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात ग्रुप डिस्कशन स्पर्धा संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये २६ एप्रिल २०२४ रोजी सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन (सेसा) व आय जी एस पुणे चॅप्टरच्या संयुक्त विद्यमाने ग्रुप डिस्कशन (समूह चर्चा) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात विभागप्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांनी प्रस्तावना करून केली. या कार्यक्रमात महाविद्यालयातील ५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
सहभागी विद्यार्थ्यांनी त्यांची बुद्धी आणि वादविवाद कौशल्ये दाखवली. या कार्यक्रमात सोशल मीडियाचा समाजावर होणारा परिणाम तसेच योगाचे फायदे आणि शैक्षणिक धोरणांच्या सुधारणांपर्यंत विचार करायला लावणारे विषय होते. या संबंधित आणि समकालीन मुद्द्यांवर त्यांचे दृष्टीकोन, अंतर्दृष्टी आणि मते व्यक्त केली. या कार्यक्रमास परीक्षक म्हणून प्रा. अभिजित सवासे, डाॅ. दिपक गणमोटे यांचे मार्गदर्शन लाभले.
या स्पर्धेत सायली बंडगर व उपविजेता गणेश चव्हाण यांनी क्रमांक पटकावले. या समुहचर्चा स्पर्धेचे सुञसंचालन कु. ओंकार खरात व गणेश चव्हाण यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. अमोल कांबळे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.