पंढरपूर सिंहगड मध्ये "परदेशातील नोकरीच्या संधी" या विषयावर व्याख्यान संपन्न*

 *पंढरपूर सिंहगड मध्ये "परदेशातील नोकरीच्या संधी" या विषयावर व्याख्यान संपन्न*



पंढरपूर: प्रतिनिधी


कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ मध्ये बुधवार दिनांक २४ एप्रिल २०२४ रोजी "परदेशातील शिक्षणाच्या संधी" या विषयावर ऋषिकेश जोशी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.

   सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक ऋषिकेश जोशी यांचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. 

   यादरम्यान ऋषिकेश जोशी यांनी अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात परदेशात वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. या शिवाय त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण शैक्षणिक माहिती यादरम्यान उपस्थित विद्यार्थ्यांना दिली. याशिवाय ऋषिराज दत्तू यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. सिद्धेश्वर गंगोंडा यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad