*पंढरपूर सिंहगड मध्ये "इ - यंत्र रोबोटिक्स" या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर मध्ये सोमवार दिनांक २९ एप्रिल २०२४ रोजी इ - यंत्र रोबोटिक्स या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. ही कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये *इ - यंत्र रोबोटिक्स* या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, या कार्यशाळेत महाविद्यालयातील द्वितीय आणि तृतीय वर्षातील विद्यार्थी उस्फूर्तपणे सहभागी झाले होते.
महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी आयआयटी बॉम्बे संचालित इ-यंत्रा लॅब उपलब्ध आहे. या लॅब मध्ये विविध प्रकारचे रोबोट उपलब्ध आहेत. या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना इ यंत्र रोबोट विषयी प्राथमिक माहिती देण्यात आली तसेच इ यंत्रा रोबोट साठी प्रोग्रामिंग तयार करणे त्याचा वापर करून एप्लीकेशन तयार करणे, आदी विषयावर माहिती देउन त्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. कार्यशाळेसाठी एक्स्पर्ट म्हणून *प्रा. अमोल क्षिरसागर, NBN सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सोलापूर* यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
ही कार्यशाळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी शिक्षक प्रतिनिधी प्रा. उदय फुले, प्रा. अनिल जाधव, प्रा. राहुल घोडके, प्रा. सोनाली घोडके यांनी तसेच विद्यार्थी प्रतिनिधी यशराज गवळी व आकाश कट्टे आदींनी परिश्रम घेतले.