*ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान*
पंढरपूर: प्रतिनिधी
सकल माळी समाज सेवा संस्था सोलापूर यांच्या वतीने शनिवार दिनांक ६ मार्च २०२४ रोजी समाज कल्याण केंद्र, रंगभवन चौक, सोलापूर येथे संस्थेच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय आदर्श शिक्षिका पुरस्कार ११ शिक्षिकांना प्रदान करण्यात आले असल्याची माहिती डाॅ. सोमनाथ बोराटे यांनी दिली.
हे पुरस्कार स्मिता क्षीरसागर, सुलोचना भंडारे, रेहाना नदाफ, सविता पवार, संगीता जाधव, शारदा शिंदे, प्रिया सुरवसे, सविता जाधव, सुचिता माळी, सुरेखा जाधव, सुनंदा शेगावकर आदी पुरस्कार शिक्षिकांनाप्रदान करण्यात आले.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले जीवन गौरव पुरस्कार हा जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा फुलचिंचोली सेवानिवृत्त मुख्याध्यापक मनोहर शंकर जाधव (गुरुजी) यांना देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टेंभुर्णी येथील ईशा पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट च्या संस्थापक अध्यक्षा शितल सोमनाथ बोराटे ह्या होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या मोहोळ पंचायत समितीच्या माजी सदस्या अल्पना दीपक माळी,म उपस्थित होत्या. यादरम्यान ह. भ.प. विष्णू महादेव पेठकर महाराज यांच्या हस्ते मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्रीरंग येळवे, उपाध्यक्ष प्रा. भानुदास बनसोडे, सचिव संतोष गायकवाड, खजिनदार प्रा.
अंगद माळी, कार्याध्यक्ष संदीप बनसोडे, सुरेश गोरे, हनुमंत वाघमारे, संतोष बनसोडे, सोपान खारे, रजिस्टर माळी, सुरेश आप्पा शिंदे, डॉ. सोमनाथ बोराटे, सुवर्णा गायकवाड, अनुराधा खारे आदींसह सर्व समाज बांधव व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राध्यापक सुमित गाडेकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार कल्याण बारवे यांनी मानले.