स्वेरीत शिक्षणाबरोबरच संस्कार देखील मिळतात -सेवानिवृत्त मुख्याध्यापक भीमराव जाधव स्वेरीच्या ‘एमबीए’ मध्ये ‘पालक मेळावा’ संपन्न


स्वेरीत शिक्षणाबरोबरच संस्कार देखील मिळतात

                                                                -सेवानिवृत्त मुख्याध्यापक भीमराव जाधव

स्वेरीच्या ‘एमबीए’ मध्ये ‘पालक मेळावा’ संपन्न



पंढरपूर- ‘स्वेरीमध्ये मागील कांही वर्षांपासून आपण नियमितपणे पाहतो आहोत की, या ठिकाणी आदर्श विद्यार्थी घडवला जातोय. स्पर्धेच्या युगात विद्यार्थी हा समाजात ताठ मानेने जगण्यासाठी स्वेरीच्या डॉ. रोंगे सरांच्या माध्यमातून प्राध्यापकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांकडून जे परिश्रम करून घेतले जात आहेत त्यांचे कौतुक करावेसे वाटते. स्वेरीमध्ये विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र ओळखणारे शिक्षक आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये योग्य नियोजन दिसून येते. स्वेरीतील शिक्षणातून विद्यार्थ्यावर योग्य संस्कार होत आहेत. आई-वडिल, गुरु आणि समाजातील थोर व्यक्तींचा आदर बाळगणारी पिढी स्वेरीमध्ये तयार होत आहे. शिक्षण तर सगळीकडेच मिळते पण स्वेरीतून शिक्षणाबरोबर संस्कार देखील मिळतात ही बाब खरोखरच कौतुकास्पद आहे.’ असे प्रतिपादन निमगाव (म.) येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक व पालक प्रतिनिधी भीमराव जाधव यांनी केले.

      गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या ‘एमबीए’ अर्थात ‘मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनीस्ट्रेशन’ या विभागातर्फे ‘पालक मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी पालक प्रतिनिधी म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक भीमराव जाधव हे मार्गदर्शन करत होते. तर दुसरे पालक प्रतिनिधी महादेव जेधे तर महिला पालक प्रतिनिधी म्हणून सौ. सविता कोळसे पाटील ह्या उपस्थित होत्या. दीपप्रज्वलनानंतर प्रास्तविकात प्रा. एम.एम.भोरे यांनी एमबीए विभागाची संपूर्ण माहिती देताना दोन वर्षाच्या अभ्यासक्रमात घेण्यात येणारे विविध उपक्रम, महाविद्यालयाच्या सोई- सुविधा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व ग्रंथालयातील उपलब्ध संदर्भ पुस्तके व संबंधित बाबी सविस्तर पणे सांगितल्या. पालक प्रतिनिधी महादेव जेधे म्हणाले की, ‘जीवन एक संघर्ष असून अशा संघर्षात स्वेरीमध्ये उचललेले प्रत्येक पाऊल हे स्तुत्य असते. त्यामुळे आमच्या मुलांमध्ये आत्मविश्वास वाढत आहे.’ असे सांगून स्वेरीच्या ‘पंढरपूर पॅटर्न’ चा गौरव केला. विभागप्रमुख प्रा.करण पाटील हे पालकांशी संवाद साधताना म्हणाले की, ‘पाल्यांच्या जडणघडणीमध्ये पालकांचा अत्यंत महत्वाचा वाटा असल्यामुळे आणि पाल्यांच्या प्रगतीसाठी पालकांसमवेत सुसंवाद व्हावा या हेतूने या ‘पालक सभे’चे आयोजन केले आहे. यामध्ये विविध शैक्षणिक उपक्रम, ट्रिपल पीई, इफेक्टिव्ह टीचिंग-लर्निंग स्कीम, नाईट स्टडी, महाविद्यालयाला मिळालेली विविध मानांकने, स्पर्धा परीक्षेची तयारी, प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी घेतलेली गरुड झेप, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी प्राणायम, आर्ट ऑफ लिव्हिंग सारखे प्रशिक्षण दिले जातात.’ असे सांगून मोबाईलचा वापर गरजेपुरताच करावा व पाल्याच्या उज्वल भवितव्यासाठी महाविद्यालयातील शिक्षकांशी सातत्याने संवाद साधावा. यामुळे पाल्य हा सतर्क राहून विकासाच्या दिशेने झेपावतो'. प्रा. अमाद अहमद यांनी एमबीए च्या प्लेसमेंट विभागाची माहिती देवून गत वर्षापर्यंत प्लेसमेंट द्वारे विविध बँका आणि कंपन्यामध्ये उपलब्ध झालेल्या नोकरीच्या संधी बाबतची आकडेवारी तसेच प्लेसमेंट विभागाचे कार्य, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांची पात्रता, संवाद कौशल्ये, विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास वाढीसाठी व करिअर करण्यासाठी आवश्यक बाबी, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, संभाषण कौशल्य, स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी? आदी करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची माहिती पालकांना दिली. यावेळी महिला पालक प्रतिनिधी सौ. संध्या जोशी, सौ. सविता कोळसे पाटील, यांच्यासह काही पालकांनी आपले विचार मांडले. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजिलेल्या या पालक सभेत जवळपास १०० पालक तसेच, स्वेरीच्या ‘एमबीए’ विभागातील डॉ. एन.एस. मगर, डॉ. आर.आर.येळीकर, प्रा. पी.एस.मोरे, प्रा. के.पी. कौंडूभैरी, प्रा. एल.डी. जोशी यांच्यासह इतर प्राध्यापक उपस्थित होते. पालक मेळाव्याचे सूत्रसंचालन प्रा. एम.एम. भोरे यांनी केले तर प्रा. एस.डी. सरीक यांनी आभार मानले.


सन २००८ साली स्थापन झालेल्या ‘एमबीए’ अभ्यासक्रमाची ही पालक सभा पहिल्यांदा भरली. या मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांच्या उज्वल करिअरसाठी प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे सरांच्या सूचनेनुसार संपूर्ण कॅम्पस मधील भाषा ही इंग्रजी आहे. यामुळे विद्यार्थ्यांना इंग्रजीतून संभाषण करणे गरजेचे आहे. या संदर्भात खूप प्रगती झाली आहे. यात विशेष म्हणजे आता विद्यार्थ्यांबरोबरच पालक देखील आपसात इंग्रजीतून संवाद साधताहेत. काही पालकांनी सभेमध्ये इंग्रजीमधून विचार मांडले. एकूणच विद्यार्थ्यांबरोबर पालक देखील हायटेक होत असल्याचे दिसून आले. हे मात्र विशेष!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad