*पंढरपूर सिंहगडच्या १२ विद्यार्थ्यांचे गेट परीक्षेत घवघवीत यश*
पंढरपूर: प्रतिनिधी
ग्रॅज्युएट एप्टीट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग या परीक्षेमध्ये कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील १२ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
'गेट' या परीक्षेत प्रत्येक वर्षी पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधील विद्यार्थी यशस्वी होत असतात. राष्ट्रीय स्तरावरील ‘गेट २०२४’ या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अंतर्गत आणि आय.आय.एस.सी. आणि आय.आय.टी. या उच्च तंत्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून घेतल्या गेलेल्या 'गेट-२०२४' या परीक्षेमध्ये पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज मधील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील सौरभ नलवडे, सुमिञा सांगोलकर, स्वरूप धोकटे, विशाल मोरे, ओंकार क्षीरसागर, काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागातील आनंद होमकुमारे, अनिकेत यादव, माधव कांबळे, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातून ज्ञानेश्वरी जामदार, रोहिणी मोकाशी, उत्कर्ष उघडे आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील आदित्य देवकुळे आदी १२ विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे.
गेट परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, प्रमुख पाहुणे डाॅ. आर. बी. शेंडगे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. अतुल आराध्ये, उद्योजक स्वप्निल कोळेकर, सुरज डोके आदींच्या हस्ते पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि उच्च करिअर करण्यासाठी गेट परीक्षा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत असते.
'गेट' परीक्षेची तयारी पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये करून घेतली जाते. यामध्ये प्रत्येक वर्षी विविध विषयांचे मार्गदर्शन वर्ग आयोजित केले जातात. त्यामुळे पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज मधील विद्यार्थ्यांना अशा परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळते. या परीक्षेसाठी अत्यावश्यक असणारे सर्व स्टडी मटेरियल हे सिंहगडच्या लायब्ररीमधून उपलब्ध करून दिले जाते. 'गेट' ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आय.आय.टी, एन.आय.टी. सारख्या संस्थांमध्ये प्रवेश मिळतो. त्याबरोबरच या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ‘पब्लिक सेक्टर' मधील कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराच्या आणि उच्चपदाच्या नोकरीसाठी संधी मिळतात. महाविद्यालयाने विद्यार्थी वर्गाला मोफत 'गेट ट्यूटर' हे ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेले आहे. 'गेट ट्यूटर'च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना 'गेट' संदर्भात अधिक माहिती मिळून परीक्षेच्या दृष्टीने सखोल तयारी करण्यास मदत मिळाल्याने विद्यार्थी गेट परीक्षेत यशस्वी होणेसाठी मदत झाली
गेट परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डाॅ. अतुल आराध्ये, डाॅ. समीर कटेकर, प्रा. सिध्देश्वर गंगोंडा, प्रा. विनोद मोरे, डाॅ. अल्ताफ मुलाणी, डाॅ. सुभाष पिंगळे, डाॅ. श्रीगणेश कदम, डाॅ. श्याम कुलकर्णी आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.