पंढरपूर सिंहगड मध्ये "महिंद्रा नांदी फाऊंडेशनची" कार्यशाळा संपन्न
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयात शुक्रवार दिनांक २९ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत "महिंद्रा नांदी" फाऊंडेशनची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. हि कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या कार्यशाळेचे प्रशिक्षक मंजिरी लांजेकर यांचे महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळेस मंजिरी लांजेकर यांनी समूह चर्चा, मुलाखती सराव, लाईफ स्किल व्हॅल्यू, साॅफ्ट स्किल व्हॅल्यू, प्रोफेशनल इथिक्स, बाॅडी लँग्वेज इत्यादींबाबत प्रशिक्षण दिले.
या प्रशिक्षणात सर्व विभागातील ६० हून अधिक विद्यार्थिंनीनी सहभाग नोंदवला. या विद्यार्थिनीना "महिंद्रा नांदी" फाऊंडेशन तर्फे मोफत केंब्रिज विद्यापीठाचे इंग्रजी भाषेचे प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, पुस्तके आदी देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यशाळेत प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थिनीना नोकरीसाठी खुप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. हि कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, प्रा. अभिजित सवासे, राजाराम राऊत, प्रभाकर शिंदे, सूर्यकांत जाधव यांनी परिश्रम घेतले.