*सा. कार्यकर्ते भैय्यासाहेब जगताप यांच्या पाठपुराव्याला यश ....*
*महावितरण ने जारी केली मार्गदर्शक तत्त्वे....!*
यासंदर्भात सविस्तर वृत असे की, राज्यामध्ये अनेक भागात शेतकरी व नागरीक यांचे विजेच्या अपघाताने होणाऱ्या मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. यामध्ये अनेक महावितरणच्या अधिकाऱ्यांची बेजबाबदारी तसेच उपाययोजनांचा अभाव अशी अनेक कारणे दिसून आली. ही बाब लक्षात घेऊन सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते भैय्यासाहेब तानाजी जगताप यांनी उर्जा विभागाकडे याबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली होती. या मागण्यांचा गांभीर्याने विचार करत महावितरण चे राज्याचे मुख्य अभियंता प्रवीण परदेशी यांनी याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. यासंदर्भात राज्यातील सर्व मुख्य अभियंता, सर्व परिमंडळ यांना विजेबाबत नागरिकांमध्ये जागृती व सज्ञान निर्माण करण्यासाठी जिल्हा स्तरावर जनजागृती मेळावे आयोजित करणे, महावितरण टोल फ्री नंबर जारी करणे, तसेच सार्वजनिक ठिकाणी जनजागृती फलक लावणे, वीज मदत,तपासणी साठी संपर्क क्रमांक प्रसिद्ध करणे, आदी. तसेच सदर कामाचा अहवाल मुख्य कार्यालयास त्रैमासिक सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
या निर्णयामुळे शेतकरी तसेच नागरी यांच्यामध्ये विजेचे सज्ञान वाढेल आणि अपघाताचे प्रमाण कमी होईल असे मत सा. कार्येकर्ते भैय्यासाहेब तानाजी जगताप यांनी व्यक्त केले व या निर्णयाबद्दल महावितरण चे मुख्य अभियंता प्रवीण परदेशी यांचे आभार मानले.