*पंढरपूर सिंहगड मध्ये "रेझ्युम रायटिंग अँड स्पीच काॅम्पिंटेशन स्पर्धा*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये शुक्रवार दिनांक १९ एप्रिल २०२४ रोजी "रेझ्युम रायटिंग अँड स्पीच काॅम्पिंटेशन स्पर्धेचे" आयोजन करण्यात आले होते. हि स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
"रेझ्युम रायटिंग अँड स्पीच काॅम्पिंटेशन स्पर्धेचे उद्घाटन मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी, डाॅ. अतुल आराध्ये, डाॅ. दिपक गानमोटे, प्रा. अभिजित सवासे, प्रा. ऋषिकेश देशपांडे आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने स्पर्धेची सुरुवात करण्यात आली.
मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात आयोजित करण्यात आलेल्या "रेझ्युम रायटिंग अँड स्पीच काॅम्पिंटेशन स्पर्धेचे प्रमुख पाहुणे म्हणून डाॅ. दिपक गानमोटे व प्रा. अभिजित सवासे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी बोलताना म्हणाले, विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात विविध स्पर्धा आयोजित करत आहे. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभागी होणे आवश्यक आहे. प्रत्येक वेळेला नवनवीन इव्हेंट महाविद्यालयात राबवत आहे. या इव्हेंट मधुन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार असल्याचे मत डॉ. श्याम कुलकर्णी यांनी मानले.
यादरम्यान डाॅ. अतुल आराध्ये, प्रा. अभिजित सवासे आदीनी उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित केले. या स्पर्धेचे सुञसंचालन ज्ञानेश्वरी भोईटे व आकांक्षा घोलप यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. ऋषिकेश देशपांडे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.