*पंढरपूर सिंहगड मध्ये "नॉन कन्वेंशनल मशीन" या विषयावर व्याख्यान संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात प्रा. एस ये जेऊरकर त्यांचे "नॉन कन्वेंशनल मशीन" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. व्याख्यानाच्या सुरुवातीस मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डाॅ. श्याम कुलकर्णी यांचे हस्ते प्रा. जेऊरकर यांचे स्वागत करण्यात आले.
पुढे बोलताना प्रा. एस ए जेऊरकर म्हणाले, अपारंपारिक मशीनिंग प्रोसेस याविषयी स्त्रोत माहिती पुरवली पारंपारिक मशीनिंग प्रोसेसेस आणि त्यांचे असलेले लिमिटेशन्स याविषयी माहिती दिली नॉन कन्व्हेंशनल मशीन मध्ये इलेक्ट्रो डिस्चार्ज मशीन इलेक्ट्रो केमिकल मशीन इरोजन मशीन तसेच वॉटर जेट कटिंग या प्रोसेसच्या आधारे कोणताही कॉम्प्लिकेटेड मेकॅनिकल पार्ट सुलभरीत्या तयार करता येऊ शकतो असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. अतुल कुलकर्णी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मेकॅनिकल विभागाच्या सर्व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले.