*पंढरपूर सिंहगड मध्ये 'बिल्डिंग प्लांनिंग अँड डिझाइन उपनियमानुसार' या विषयावर व्याख्यान संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर येथील स्थापत्य इंजिनिअरींग विभाग व सिव्हिल इंजिनीअरिंग स्टुडंट्स असोसिएशन (सेसा) यांच्या संयुक्त विद्यमाने व काॅलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे व उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली
"बिल्डिंग प्लांनिंग अँड डिझाइन उपनियमानुसार" या विषयावर तज्ञ व्याख्यानं आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान यशस्वीशरीतीने संपन्न झाले असल्याची माहिती सिव्हिल इंजिनीअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांनी दिली.
हे व्याख्यान विद्यार्थ्यांना बिल्डिंग उपविधी, सेवा, सुविधा आणि नियोजन करण्यास फायदेशीर ठरणार आहे व तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व नोकरीत संधी मिळण्याच्या प्रक्रियेतील एका महत्त्वाच्या टप्प्याचा सराव म्हणून आयोजित केले होते.
या याख्यान अंतर्गत ८० हुन अधिक विद्यार्थ्यानी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिव्हिल इंजिनीअरिंग विभागातील डॉ. श्रीगणेश कदम, प्रा. अमोल कांबळे, प्रा. शेखर पाटील व विदयार्थी प्रतिनिधी म्हणून सुमित्रा संगोलकर, तेजस्वी खांडेकर यांनी जबाबदारी पार पाडली व शिक्षेकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.