मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागातील गावांचा आमदार प्रणिती शिंदे यांनी केला गावभेट दौरा
टँकर व जनावरांकरीता चारा छावणी चालु करण्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी
सोलापूर : दिनांक 06 मार्च 2024 रोजी मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागातील गावांचा आमदार प्रणिती शिंदे यांनी गावभेट दौरा केला. या दौऱ्यामध्ये तेथील टँकर व जनावरांकरीता चारा छावणीबाबत समस्या जाणून घेतली. या गावामध्ये टँकर व जनावरांकरीता चारा छावणी चालु करण्याबद्दल आमदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी.
यामध्ये 1) पाठकळ-मेटकरवाडी, 2) खडकी, 3) नंदेश्वर, 4) भोसे, 5) महमदाबाद हुन्नूर, 6) लोणार, 7) पडोळकरवाडी, 8) रेवेवाडी, 9) मानेवाडी, 10) हुन्नूर, 11) मारोळी, 12) चिक्कळगी, 13) शिरनांदगी, 14) रड्डे, 15) सिध्दनकेरी, 16) जालीहाळ, 17) हाजापूर या गावांना भेट दिले. या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची व जनावरांकरीता चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झालेली आहे.
यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले कि, सोलापूर जिल्ह्यातील एकमेव विरोधी पक्षाची आमदार आहे. आजपर्यंत इतर कोणाच्याही मतदार संघात हस्तक्षेप केला नाही. पण मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळ ग्रस्तांच्या अडचणी ज्यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांच्या समोर आल्या, त्यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी त्यांच्या पध्दतीने सोडविण्यासाठी प्रयत्न केला आणि यापुढेही करत राहणार असे सांगितले.
यावेळी ज्येष्ठ नेते शिवाजीराव काळुंगे सर, तालुका अध्यक्ष प्रशांत साळे, नंदकुमार पवार (वकील), अभिजित पाटील, मनोज यलगुलवार, विनोद भोसले, रविकिरण कोळेकर, पांडूरंग जावळे, सुरेश कोळेकर, मनोज माळी, संदिप पवार, मारुती वाकडे, पांडूरंग माळी, नाथा ऐवळे, तिरुपती परकीपांडला व बहुसंख्य नागरीक उपस्थित होते.