स्वेरीकडून येत्या ११ मार्च पासून ऑनलाईन सीईटी ‘क्रॅश कोर्स’चे आयोजन बारावी सायन्सचे विद्यार्थी करू शकतात एमएचटी-सीईटी ची ऑनलाईन तयारी


स्वेरीकडून येत्या ११ मार्च पासून ऑनलाईन सीईटी ‘क्रॅश कोर्स’चे आयोजन

बारावी सायन्सचे विद्यार्थी करू शकतात एमएचटी-सीईटी ची ऑनलाईन तयारी



पंढरपूर– ‘स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर कडून येत्या सोमवार, दि.११ मार्च २०२४ पासून ते रविवार, दि. ३१ मार्च २०२४ पर्यंत ऑनलाईन सीईटी ‘क्रॅश कोर्स’चे आयोजन करण्यात आलेले असून यामध्ये अभियांत्रिकी प्रवेशाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स या तीन विषयांवर स्वेरीतील तज्ञ प्राध्यापक मार्गदर्शन करणार आहेत. हा ‘क्रॅश कोर्स’ मोफत असून यामध्ये बारावी सायन्सची परीक्षा दिलेले विद्यार्थी यामध्ये सहभागी होऊ शकतात. तसेच या ‘क्रॅश कोर्स’ नंतर स्वेरी मध्ये ‘मॉक सीईटी’चे देखील आयोजन करण्यात आले आहे. तरी विद्यार्थ्यांनी या अनमोल संधीचा लाभ घ्यावा.’ असे आवाहन स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी केले आहे.

         शासनाच्या सी.ई.टी. सेलकडून बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार घेतली जाणार आहे. पीसीएम ग्रुपची सीईटी परीक्षा दि.२५ एप्रिल ते ३० एप्रिल २०२४ दरम्यान घेतली जाणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेल्या एमएचटी- सीईटी २०२४ या परीक्षेची तयारी कशी करावी? यासाठी अभ्यासक्रम कोणता? याचे स्वरूप असे सीईटी परीक्षेसंबंधी अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना पडतात आणि हाच धागा पकडून स्वेरीने या मोफत ऑनलाईन ‘क्रॅश कोर्स’चे आयोजन केले आहे. विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी मानून त्यांच्या हिताच्या बाबी लक्षात घेवून आणि शैक्षणिक गरजांना अनुसरून ‘स्वेरी’ नेहमीच नवनवीन शैक्षणिक उपक्रम राबवत असते. त्याचाच एक भाग म्हणून ‘स्वेरी’ने बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी या ‘क्रॅश कोर्स’चे आयोजन केले आहे. 'विद्यार्थ्यांना या ऑनलाइन ‘क्रॅश कोर्स’च्या माध्यमातून ‘एमएचटी- सीईटी २०२४’ या परीक्षेच्या तयारीची व सरावाची संधी मिळणार आहे. तरी या सुविधेचा विद्यार्थ्यांनी अवश्य लाभ घ्यावा.’ असे आवाहन प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी केले आहे. ‘विद्यार्थ्यांनी ‘क्रॅश कोर्स’ साठी आपले नाव नोंदवण्यासाठी मोबाईल क्र. ९५९५९२११५४ व ९१६८६५५३६५ यावर संपर्क साधण्याचे आवाहन अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता प्रा. करण पाटील यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad