*पंढरपूर सिंहगडच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागात सिव्हिलाइज २के २४ कार्यक्रम संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कोर्टी पंढरपूर येथे दिनांक १६ मार्च २०२४ रोजी सिव्हिलाइज २ के २४ फोर हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन.
या कार्यक्रमाचे उद्घाटन उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी आणि डॉ. चेतन पिसे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
या कार्यक्रमात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मॉडेल एक्सपो, इनोव्हेट आणि लुडो यांचा समावेश करण्यात आला होता.
या कार्यक्रमात विविध महाविद्यालयातील २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यपूर्ण विचारांची जागृती करिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे मूल्यमापन करण्यासाठी डॉ. अतुल आराध्ये व डॉ. सोमनाथ कोळी आणि धनाजी कदम यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
हा कार्यक्रम स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील सेसाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. अजित करांडे व प्रा. मिलिंद तोंडसे यांनी जबाबदारी पार पाडली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभागातील सर्व शिक्षक आणि शिक्षेकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.