*पंढरपूर सिंहगड मध्ये "सॉफ्टवेअर डेव्हलमेंट लाईफ सायकल" या विषयावर चर्चासत्र संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर मध्ये काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागात शनिवार दिनांक २८ मार्च २०२४ रोजी सॉफ्टवेअर डेव्हलमेंट लाईफ सायकल या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात आला होते. हे चर्चासत्र मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागात *सॉफ्टवेअर डेव्हलमेंट लाईफ सायकल* या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते, या चर्चासत्रात काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील शिक्षक वृंद आणि तृतीय वर्षातील विद्यार्थी सहभागी झाले होते.
या चर्चासत्रामध्ये विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल या विषयावर माहिती देण्यात आली. चर्चासत्रासाठी *श्री. प्रवीण गुरव, बॅकयेंड डेव्हलपर, मोमेंटम मेट्रोपॉलिटन सर्व्हिसेस, मुंबई* यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.
हे चर्चासत्र काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. सुभाष पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होते. हे चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.