*पंढरपूर सिंहगड मधील स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांची इमारत बांधकामास भेट*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस के एन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील तृतीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी इमारतीच्या बांधकाम स्थळास भेट दिली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज मधील स्थापत्य अभियांत्रिकी मधील तृतीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना काँक्रिट कॉलम फुटींग चे डिझाईन प्रात्यक्षिकाद्वारे समजण्यासाठी विभागाने बांधकाम स्थळास "स्टडी व्हीजीट" आयोजित केली होती. यावेळी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बांधकामाच्या ठिकाणी डिझाईन प्रमाणे सळई कशी बांधली जाते व लाईनआऊट वेळी कोणत्या गोष्टी तपासल्या पाहिजेत याची माहिती प्रा. गणेश लकडे व अभियंता प्रशांत कदम यांनी दिली.
या उपक्रमासाठी मलपे डेव्हलपर्स व कॉन्ट्रॅक्टर्स पंढरपूर चे श्री विशाल मलपे यांची मोलाची मदत व मार्गदर्शन झाले.
हा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ स्वानंद कुलकर्णी, संशोधन व विकास अधिष्ठाता डॉ. चेतन पिसे व विभागप्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही इमारत बांधकाम भेट आयोजित करण्यात आली होती. सदर भेटीमध्ये तृतीय वर्ष स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये शिकणारा विद्यार्थी कुमार चंद्रशेखर पवार याने महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. यावेळी प्रा. गणेश लकडे, प्रा. अमोल कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
हा उपक्रम यशस्वीपणे पार पडण्याकरिता विभागातील शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.