*पंढरपूर सिंहगड मध्ये "इंडस्ट्रियल ऑटोमेशन" या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात सोमवार दिनांक ११ मार्च २०२४ रोजी "इंडस्ट्रियल ऑटोमेशन" या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. हि कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. विनोद मोरे यांनी दिली.
या कार्यशाळेचे उद्घाटन उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, संदिप झगडे, प्रा. विनोद मोरे, प्रा. प्रदीप व्यवहारे, प्रा. दत्तात्रय कोरके, प्रा. अमोल गोडसे आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांच्या हस्ते संदिप झगडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
दरम्यान उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित केले. कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा. विनोद मोरे यांनी केले.
या कार्यशाळेस संदिप झगडे यांनी अद्यावत साॅफ्टवेअर बद्दल तसेच पी एल सी स्कॅडा ऑटोमेशन बद्दल महत्वपूर्ण माहिती देऊन प्रात्यक्षिक द्वारे उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
हि कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रा. अमोल गोडसे, प्रा. दत्तात्रय कोरके, प्रा. अंजली चांदणे आदींसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दिपाली सुडके आणि तृप्ती उत्पात यांनी केले.