*स्थापत्य अभियांत्रिकी विभागात ए आय फ्युचर ऑफ कन्स्ट्रक्शन विषयावर व्याख्यान संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोर्टी, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागात बुधवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२४ रोजी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
हे व्याख्यान ए आय फ्युचर ऑफ कन्स्ट्रक्शन या विषयावर घेण्यात आले या व्याख्यानाचे प्रमुख पाहुणे डॉ. सचिन जैन यांचा सत्कार महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी केला तसेच सुमन जैन श्री रमेश कुलकर्णी यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
हे व्याख्यान स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील स्टुडन्ट चाप्टर च्या अंतर्गत पार पाडण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक यशवंत पवार यांनी केले. डॉ. सचिन जैन यांनी ए आय चे फायदे व स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये त्याचा वापर यावर मार्गदर्शन केले विभाग प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांनी स्थापत्य अभियांत्रिकी विभागात होणाऱ्या विविध उपक्रमाविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक मिलिंद तोंडसे यांनी मांडले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ.श्रीगणेश कदम, डॉ. चेतन पिसे तसेच विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि स्टुडन्ट चाप्टर मधील सी डब्ल्यू सी विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.