खेडच्या स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट मध्ये ‘पालक सभा’ संपन्न


खेडच्या स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट मध्ये ‘पालक सभा’ संपन्न




सोलापूर- खेड (ता.उत्तर सोलापूर) येथील स्वेरी तथा श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर संचलित एस.व्ही.आय.टी. तथा स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या पॉलिटेक्निक महाविद्यालयात दि.०१ फेब्रुवारी २०२४ रोजी ‘पालक सभा’ आयोजित करण्यात आली होती. या पालक सभेला पालकांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.



          दीप प्रज्वलनानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एस.पाटील यांनी अल्पावधीत विद्यार्थीप्रिय बनलेल्या खेडच्या स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या यशाचा आलेख सादर करून पालकांचे स्वागत केले. यावेळी पालक प्रतिनिधी दादासाहेब गायकवाड व महिला पालक प्रतिनिधी म्हणून सौ.मीरा नाटे या व्यासपीठावर उपस्थित होत्या.पुढे विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने पालकांना उत्तम पद्धतीने मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी मानून आणि स्वेरीच्या अभूतपूर्व यशाच्या आधारे स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट मधील विद्यार्थ्यांच्या विकासाच्या दृष्टीने या देखील संस्थेची योग्य वाटचाल सुरु आहे.’ असे सांगून प्राचार्य डॉ.एस.एस.पाटील यांनी महाविद्यालयाच्या यशाचा आलेख पालकांसमोर सादर केला. यावेळी सर्व विभागप्रमुखांतर्फे विभागातील उपलब्ध साहित्य सामग्री, विद्यार्थ्यासाठी संस्थेकडून पुरविण्यात येणाऱ्या सुविधा या संदर्भात माहिती देण्यात आली. पालक सभेचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला. त्यामध्ये कॉम्प्युटर विभागातून प्रथम क्रमांक मिळविलेले श्रेयश महेश कुलकर्णी (८९ %), हर्षदा दत्तात्रय काकेकर (८८%), धवलराज दादासाहेब गायकवाड (८७ %), इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातून विक्रांत राजेंद्र शिंदे (८७.१८ %), ओंकार रणजीत कदम (८४ %), प्रतिक्षा प्रसन्न चव्हाण (८३%), मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातून आदित्य सचिन गुळवे (८४ %), ईश्वरी विजय ताटे (८३.१८ %), विकास मारुती यांकीकर (८२.२४ %), सिव्हील इंजिनिअरिंग विभागातून प्राप्ती चंद्रकांत सुडके (८०.१२ %), रोशनी बंडू पुजारी (७९.२९ %), आदित्य संतोष शिरसागर (७८.२४ %), या विद्यार्थ्यांचा समावेश होता. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ..बी.पी.रोंगे यांनी विशेष कौतुक करून पाठ थोपटली. या पालक सभेत सोलापूर व खेड पंचक्रोशीतील जवळपास १५० पालक उपस्थित होते. यावेळी पालकांनी ‘संस्थेवर विश्वास ठेवल्याचे सार्थक झाले’ असे म्हणून महाविद्यालयाच्या सोयी-सुविधांबाबत गौरवोद्गार काढले. यावेळी प्रा. एस. एन. शिंदे, प्रा. पी. यू. वाघमारे, प्रा. ए. सी.सावंत, प्रा. एस. एस. पाटील, प्रा. के. ए. पाटील, प्रा.एस. एन. पाटील, प्रा. टी. आर. खरटमल, प्रा. जे. एस. ताटीकोंडा, प्रा. ए. एस. कांबळे, प्रा. एस. के. गायकवाड, प्रा. एस. एस. भोसले, प्रा. पी. एस. माळी आदी प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. पी.एच.खोले यांनी केले तर आभार प्रा.श्रीधर कुलकर्णी यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad