*यश हवे असेल तर आत्मविश्वास, जिद्द असली पाहिजे- महादेव घोंगडे*
*पंढरपूर सिंहगड मध्ये "मराठी भाषा दिन" उत्साहात साजरा*
पंढरपूर: प्रतिनिधी
जीवन हे अतिशय सुंदर आहे. परीक्षेत एकदा अपयश आले म्हणून निराश न होता. पुन्हा प्रयत्न करणे म्हणजे आयुष्य आहे. आईवडील आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी काबाडकष्ट करत असतात. आईवडिलांना समजुन घेतले पाहिजे. त्यांच्या मनातील अपेक्षा काय आहेत? हे जमवून घेऊन त्या पुर्ण करण्यासाठी तुम्ही मेहनत घेतली पाहिजे. साहित्यातून संस्कार घडविले जातात. माणुस आज पैशाच्या मागे लागला आहे. सन्मानाने पैसा मिळविणे हि आपली संस्कृती आहे. माणसा पेक्षा जास्त महत्व पैशाला देऊ नका. पैसा म्हणजे सुख-समाधान नसते. आयुष्यात यश हवे असेल आत्मविश्वास, जिद्द असणे आवश्यक असल्याचे मत महादेव घोंगडे यांनी बोलताना व्यक्त केले.
२७ फेब्रुवारी २०२४ रोजी मराठी राजभाषा दिन महाराष्ट्राचे जेष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणून मराठी भाषा दिन साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली "मराठी भाषा गौरव दिन" साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती व कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पुजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांची ओळख उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी करून दिली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डाॅ. स्वानंद कुलकर्णी हे होते. प्रमुख पाहुणे महादेव घोंगडे यांचे स्वागत महाविद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. दरम्यान डाॅ. संपत देशमुख यांनी कुसुमाग्रज यांचा कार्याचा आढावा घेत त्यांनी केले लेखन साहित्यांचा आढावा उपस्थितांसमोर मांडला. दरम्यान श्रृती दिवटे या विद्यार्थिनीनी कुसुमाग्रज यांची कविता वाचन केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्वी खाांडेकर व वैष्णवी जाधव-पाटिल यांनी केले तर उपस्थितांचे आभार डाॅ. दिपक गानमोटे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.