*पंढरपुर सिंहगड मध्ये "एक्सप्लोर ए डायनामिक करिअर विथ बीम टेक्नॉलॉजी" या विषयावर व्याख्यान संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मधील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात सोमवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रा. प्रियांका सांगळे यांचे "एक्सप्लोर ए डायनामिक करिअर विथ बीम टेक्नॉलॉजी" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांनी दिली.
यादरम्यान प्रा. प्रियांका सांगळे यांचा सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने प्रा. गणेश लकडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
हा कार्यक्रम स्थापत्य अभियांत्रिकी विभागात विभागातील सेसाच्या अंतर्गत पार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधी सुमित्रा सांगोलकर यांनी केले. प्रमुख पाहुणे प्रा. प्रियांका सांगळे यांनी बीम टेक्नॉलॉजीचे स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये असणारे वापर आणि फायदे या विषयी मार्गदर्शन केले. स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये वापरले जाणारे वेगवेगळे सॉफ्टवेअर याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. अभियांत्रिकी मध्ये वाढत जाणारा सॉफ्टवेअरचा वापर याविषयी विद्यार्थ्यांना जागरूकता निर्माण व्हावी असे मत यादरम्यान बोलताना प्रा. प्रियांका सांगळे यांनी यादरम्यान मार्गदर्शन करताना म्हटले या कार्यक्रमात द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमात सुञसंचालन व आभार प्रदर्शन कुमारी प्राप्ती वेळापूरकर हिने केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक आणि शिक्षेकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.