आगामी निवडणुकीच्या पाश्वर्भुमीवर पंढरपूर तालुक्यात ‘गाव चलो’ अभियानाची सुरवात मा.आ.प्रशांत परिचारक
आगामी माढा लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुक्यात भाजपने गाव चलो अभियान सुरू केले आहे. या अभियानात सुमारे 200 प्रवासी कार्यकर्ते माढा विधानसभा व सांगोला विधानसभा मतदार संघातील बूथ वर प्रवास करणार आहेत. मोदी सरकार व महायुती सरकारने राबविलेल्या विविध योजनांची माहिती सामान्य नागरिकांपर्यंत घेऊन जाणे तसेच पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्याचे काम यामध्ये केले जाणार असल्याची माहिती माढा लोकसभा प्रभारी व मा.आ.प्रशांत परिचारक यांनी दिली.
भाजपाच्या ‘गाव चलो’ अभियानात सर्वांशी संवाद साधण्यात येणार आहे. मोदी की गॅरंटीचा नारा गावोगावी पोहचविला जाणार आहे. गाव चलो अभियानात बूथ प्रमुखांशी बैठक घेतली जाणार, मतदार यादीमधील लोकांशी चर्चा करणे, कार्यकर्त्यांशी संवाद साधणे, नमो एपबाबत प्रचार करणे, हॅन्ड बिल वाटप करणे, संघाच्या वरिष्ठ मंडळींशी चर्चा, युवकांसाठी नमो चषकचे आयोजन करणे, सामाजिक संस्थांशी चर्चा करणे, भिंती रंगवण्याचे काम करणे, बूथ कमिटी, बूथ कार्य समिती, बूथ स्तरावरील व्हॉटसअप ग्रुप ई. संघटनात्मक कार्य बूथ स्तरावर पूर्ण केली जाणार आहेत. असे एकूण 18 कार्यक्रम राबविले जाणार आहेत.
प्रत्येक बूथ वर संघटनात्मक बांधणी देखील पूर्ण करण्याचे काम या गाव चलो अभियानात केले जाणार असून फिर एक बार मोदी सरकारचा नारा यानिमित्ताने माढा लोकसभा भाजपने दिला आहे. भाजपाला 51 टक्क्यांहून अधिक मतदान कसे होईल यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे प्रशांत परिचारक यांनी म्हटले आहे. या अभियानात 24 तास एका गावात मुक्कामी राहून बूथ लेव्हलला भाजपाचा प्रचार करण्यात येणार आहे.
यावेळी लक्ष्मण केकाण संयोजक गाव चलो अभियान, राजकुमार पाटील लोकसभा समन्वय, भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, सचिन शिंदे जिल्हा सरचीटणीस, शंभुराजे जगताप युवा मोर्चा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप चव्हाण, कैलास खुळे, लक्ष्मण धनवडे, भगवान चौगुले, प्रणव परिचारक, भास्कर कसगावडे तसेच पांडुरंग परिवारातील प्रमुख पदाधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तरूण कार्यकर्ते व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.