पंढरपूर सिंहगड संत गाडगे महाराज यांना अभिवादन*

 *पंढरपूर सिंहगड संत गाडगे महाराज यांना अभिवादन*



पंढरपूर: प्रतिनिधी 


एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये शुक्रवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२३ रोजी संत गाडगे महाराज यांची जयंती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे म यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली अशी माहिती उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी दिली.

    संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. श्रीगणेश कदम, डॉ. संपत देशमुख, प्रा. अविनाश हराळे यांच्या हस्ते करण्यात आले. यादरम्यान दिपप्रज्वलन करून संत गाडगे महाराज यांना अभिवादन करण्यात आले.

गाडगे महाराज हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय आणि सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे. गाडगेबाबा यांनी त्यांच्या काळात समाजप्रबोधनाबरोबरच राज्यातील प्रमुख शहरांत व तीर्थक्षेत्री धर्मशाळा, आश्रमशाळा, नद्यांना घाट, पाणपोया, गोरक्षण, अंध-अपंगांसाठी सदावर्त, मुलांसाठी शाळा-कॉलेज व वसतिगृहे बांधून सर्वसामान्य जनतेची राहण्याची सोय केली.

 यादरम्यान महाविद्यालयातील प्रा. नामदेव सावंत, प्रा. अंजली चांदणे, प्रा. समाधान माळी, प्रा. संदीप लिंगे, कार्यालयीन अधीक्षक सिद्धेश्वर लवटे, संजय बनकर, एकनाथ इंगवले, राजेंद्र राऊत, योगेश नवले, नवनाथ माळी, संतोष भुजबळ, प्रभाकर शिंदे, गणेश वसेकर आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad