*कृषीदूतांनी शेतकऱ्यांना शेती कर्ज मागणीसाठी केले मार्गदर्शन ..*
प्रतिनिधी
*कळमण:ग्रामीण कृषी जागरुकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत लोकमंगल कृषी महाविद्यालय, वडाळा येथील कृषीदूतांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कळमण येथील शेतकऱ्यांना शेती कर्ज मागणीसाठी अर्ज कसा करावा व तसेच कर्जासाठी लागणारी विविध कागदपत्रे याची माहिती दिली. त्यावेळी बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे मॅनेजर व्यंकटेश काथार सर यांनी किसान क्रेडिट कार्ड योजनेची शेतकऱ्यांना माहिती पटवून दिली तसेच लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा प्रा. नवनाथ गोसावी सर यांनी बँक मॅनेजरशी संवाद साधून कर्जाचे प्रकार याबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली . बँक मॅनेजर काथार सरांनी शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. त्यानंतर कळमन गावातील शेतकरी श्री.सुयोग होनमुटे यांचा शेतीच्या कर्जासाठी अर्ज दाखल केला. त्यावेळी सौरभ सुर्वे, अरबाज शेख, शुभम वाघ,वैभव शेळके, वैभव शिंदे, सुमित शिंदे,अविनाश पिंजारी यांनी बँकेतील विविध शेती विषयक योजनांसाठी अर्ज कसा करावा ही माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहचवली. यासाठी लोकमंगल कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे, प्रा. नवनाथ गोसावी व कार्यक्रम अधिकारी प्रा.आकाश अवघडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.*