*अस्सल शाहिरी बाण्यातून पंढरपूरकरांनी घेतले शिवचरित्राचे ज्वलंत दर्शन*
(अभिजीत पाटील यांच्या माध्यमातून सलग तीन दिवस व्याख्यानमालेचे शिवतीर्थावर आयोजन)
प्रतिनिधी पंढरपूर :
शिवजन्मोत्सवानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते तथा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या आज माध्यमातून शिव व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या नावीन्यपूर्ण संकल्पनांमधून चेअरमन श्री.अभिजीत धनंजय पाटील हे नेहमीच पंढरपूरकरांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत असतात.
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर या व्याख्यानमालेचे अभिनव आयोजन त्यांनी केले आहे. या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प शिवशाहीर श्री.राजेंद्र कांबळे यांच्या शाहिरी व पोवाड्याच्या कार्यक्रमाने संपन्न झाले..
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचे जीवन चरित्र केवळ महाराष्ट्र अथवा भारत नव्हे तर संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे.. शिवचरित्रातून विचारांची मोठी प्रेरणा मिळते. आपल्या अद्वितीय शाहिरी बाण्याने श्री.राजेंद्र कांबळे यांनी उपस्थित प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते..
अंगावर शहरा आणणाऱ्या त्यांच्या उद्बोधक वाणीतून हजारो प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. या व्याख्यानमालेचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आयोजकांनी आवाहन केले आहे..
यावेळी चेअरमन अभिजीत पाटील,माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, श्रीरंगबापू बागल, संतोष कवडे, मोहम्मद उस्ताद, सौदागर मोळक, आरपीआयचे संतोष पवार, ॲड.किर्तीपाल सर्वागोड,रिपब्लिकन पक्षाचे नेते आप्पासाहेब जाधव, संचालक सचिन पाटील, प्रवीण भोसले, गोरख ताड, दत्तात्रय माने, रेडगावचे सरपंच सुनील थोरबोले, गादेगावचे बाबासाहेब बागल, संचालक जनक भोसले, शंकर शिंदे-नाईक, माऊली आटकळे, काकासाहेब मोरे, दिनकर चव्हाण, आनंद पाटील, अमित साळुंखे, रायाप्पा हळणवर, तानाजी बागल यासह आदी मान्यवर उपस्थित होते...