भारतातील कला संस्कृती हा अमूल्य ठेवा -नाट्य संस्थेच्या प्रमुख डॉ. इंदूजी नायर


भारतातील कला संस्कृती हा अमूल्य ठेवा                           

                                                                 -नाट्य संस्थेच्या प्रमुख डॉ. इंदूजी नायर

स्वेरीत ‘स्पीक मॅके’ तर्फे केरळचा ‘कोडीयट्टम’ हा कार्यक्रम संपन्न




पंढरपूर- ‘भारताच्या विविध भागातील भाषा, संस्कृती, कलाप्रकार, खाद्य हे सर्व वेगवेगळे असताना भारतीयांनी मात्र आपल्या संस्कृती व परंपरांचे खुप सुंदररीत्या जतन केले आहे. आपल्या भागात एखादा पाहुणा आला तर आपण त्यांचे स्वागत आपल्या अंगीकृत कलाप्रकाराने करतो. त्यामुळे भारताची कला संस्कृती हा एक अमूल्य ठेवा आहे आणि त्याचे खूप कौतुक वाटते.’ असे प्रतिपादन केरळ मधील नाट्य संस्थेच्या प्रमुख डॉ. इंदूजी नायर यांनी केले. 



         अलीकडच्या काळात, मोबाईलच्या युगात युवावर्ग व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. यामुळे जुनी परंपरा, कला नृत्य अविष्कार, गायन, संगीत, पारंपारिक वेशभूषा, लोकभूषा, आपसातील संवाद हे कमी होत चालले आहेत. यामुळे पाश्चात्य कला संस्कृती देखील जवळपास लोप पावत चालली आहे. त्यामुळे येणाऱ्या पिढीला हे सर्व कलाप्रकार एका बंदीस्त चित्रातच पहायला मिळणार आहेत असे वाटते. असे असताना स्वेरीमध्ये नुकताच ‘स्पीक मॅके’च्या माध्यमातून ‘कोडीयट्टम’ हा दक्षिणात्य कलाप्रकार सादर करण्यात आला. याला विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व ‘स्पीक मॅके’ यांच्या संयुक्त विद्यमाने केरळ भागातील पुरातन संस्कृत नाटक असलेल्या ‘कल्याण सौगंधी’ या नाटकातील ‘कोडीयट्टम’ हा कला प्रकार केरळच्या मुरब्बी कलावंतांनी मुक नृत्याद्वारे सादर करून विद्यार्थ्यांच्या टाळ्या मिळविल्या. ‘स्पीक मॅके’ चा समूह भारतीय संस्कृतीचा सर्वांगीण विकास करण्याचे कार्य करत आहे. विद्यार्थ्यांना भारतीय शास्त्रीय संगीत, नृत्य, कला आणि साहित्याच्या सार्थक अनुभवाचे संवर्धन करणे हा या संघटनेचा मुख्य उद्देश आहे. या पार्श्वभूमीवर ‘स्पीक मॅके’ च्या वतीने स्वेरीत ‘कोडीयट्टम’ या कलाप्रकाराचे आयोजन केले होते. यावेळी ‘केरळ’ मधील नाट्य संस्थेच्या प्रमुख डॉ. इंदूजी नायर हया भारतीय संस्कृतीचे मनसोक्त कौतुक करत होत्या. प्रारंभी स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी केरळहून आलेल्या कलावंतांचे स्वागत केले. नाट्य संस्थेच्या प्रमुख डॉ. इंदूजी नायर कोडीयट्टम या नृत्यकलेचे महत्त्व सांगताना पुढे म्हणाल्या की, ‘कोडीयट्टम’ हे एक प्राचीन भारतीय लोकनृत्य असून ज्याचा मुख्य स्रोत केरळ राज्यातील ‘कुट्टनाड’ आहे. या नृत्य प्रकारात पौराणिक कथा, संस्कृत भाषेत नाटय आणि नृत्य स्वरूपात सादर केली जाते.’ ‘कोडीयट्टम’ चे प्रमुख सांगितीक वाद्य कुंजियाटम, कुझित्ताळं, एतक्का, कुरूंकुझल आणि शंख याचा वापर केला जातो.’ असे सांगून ‘कोडीयट्टम’ नृत्यकलेबद्दलचे महत्त्व सांगितले. मार्गी मधु यांनी ‘कोडीयट्टम’ नृत्याचे जबरदस्त सादरीकरण केले. चेहऱ्यावरील हावभाव, मुकपट यांच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना उत्तम कला प्रकाराचे दर्शन दिले. 



पद्मभूषण पुरस्कार प्राप्त अम्मानूर माधव चकियार आणि त्यांचे वडील मझिक्कलूम कोचुकुत्तम यांच्याकडून मार्गी मधु यांनी ही सुंदर कला आत्मसात केली आहे. त्यांनी वेशभूषा आणि हात-पायांच्या अजब हालचालीद्वारे मुकपट सादर केला. या नाट्य प्रकाराला जितेश पी. चकियार, बी.एस.मणीक नंदन आणि राजन यांनी सुमधुर वाद्य, केरळा ढोलकी, तबला वाजवून समर्पक अशी साथ दिली तर श्रीजीत यांनी वेशभूषेचे काम पाहिले. केरळचे कलावंत मार्गी मधु यांच्या लक्षवेधी नृत्याने, वन्यप्राण्यांच्या सुक्ष्म हालचालीचे परीक्षण करून केलेले नृत्य पाहून स्वेरीचे विद्यार्थी भारावून गेले. यावेळी सेवानिवृत्त पशुवैद्यक अधिकारी डॉ. विश्वासराव मोरे, सर्व प्राचार्य, प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता प्रा. करण पाटील यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन सोनाली करवीर यांनी केले तर संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे यांनी केरळच्या कलावंतांनी सादर केलेल्या कलेचे कौतुक करून पश्चात कला संस्कृतीचे जतन करणे आवश्यक असल्याचे सांगून उपस्थितांचे आभार मानले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad