पंढरपूर सिंहगड मध्ये अमेरिकेतील उच्च शिक्षणाच्या संधी या विषयावर व्याख्यान
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये मंगळवार दिनांक १३ फेब्रुवारी २०२४ रोजी डाॅ. रियान परेरा यांचे अमेरिकेतील उच्च शिक्षणाच्या संधी याविषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर यांनी दिली.
यादरम्यान महाविद्यालयाच्या वतीने डाॅ. रियान परेरा यांचे डाॅ. सुभाष पिंगळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यापुढे बोलताना डाॅ. रियान परेरा म्हणाले, अमेरिकमध्ये उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळत असुन तेथील नामांकित विद्यापीठाची सखोल माहिती यादरम्यान उपस्थित विद्यार्थ्यांना देण्यात आली. अभियांत्रिकीचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर अमेरिकेत थेट पीएचडी अभ्यासक्रमांसाठी पुर्ण शिष्यवृत्ती भेट असुन या शिष्यवृत्तीचा अनेक विद्यार्थी लाभ घेत आहेत. अमेरिकेतील उच्च शिक्षणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नामांकित कंपनी मध्ये भरगच्च पगाराची नोकरी मिळण्यास मदत होत आहे. यामुळे पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज मधील अनेक विद्यार्थी अमेरिकेत उच्च शिक्षण घेत असल्याचे यादरम्यान डाॅ. रियान परेरा यांनी यादरम्यान बोलताना मत व्यक्त केले.
हे व्याख्यान काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील द्वितीय व तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते.
हे व्याख्यान यशस्वी करण्यासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, प्रा. सोमनाथ झांबरे, प्रा. सिद्धेश्वर गंगोंडा, प्रा. रमेश येवले, राजेंद्र राऊत, अमोल नवले, प्रभाकर शिंदे, संतोष भुजबळ यांच्या महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.