*पंढरपूर सिंहगड मध्ये "इलेक्ट्रिकल मशिन प्रशिक्षण" याविषयावर कार्यशाळा*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये शुक्रवार दिनांक ९ फेब्रुवारी २०२४ रोजी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात "इलेक्ट्रिकल मशिन प्रशिक्षण" या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. हि कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. भालचंद्र गोडबोले यांनी दिली.
या कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, प्रशिक्षक अशोक पोतदार, देविदास भोसले आणि अमोल दंदाडे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. भालचंद्र गोडबोले, प्रा. अंजली चांदणे आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यशाळेची सुरवात करण्यात आली.
या वेळी महाविद्यालयाच्या वतीने प्रशिक्षक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यशाळेत प्रशिक्षक इलेक्ट्रिकल मशिन दुरूस्ती यामध्ये फॅन, मिक्सर दुरूस्ती व सिरीज कनेक्शन, लाईट फिटिंग याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
याशिवाय इलेक्ट्रिकल सिंगल फेज व थ्री फेज अमोटार रिवायडींग स्टार दुरूस्ती याबाबत महत्वपूर्ण मार्गदर्शन या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना करण्यात आले.
या कार्यशाळेत द्वितीय व तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेले १४० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. हि कार्यशाळ यशस्वी करण्यासाठी प्रा..विनोद मोरे. प्रा. दत्तात्रय कोरके, प्रा. स्वप्ना गोड, प्रा. प्रदीप व्यवहारे, प्रा. खांडेकर, प्रा. अमोल गोडसे, तृप्ती कदम, वंदना माळी, कविता आदलिंगे, सत्यवान वसेकर आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.