पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांचे ७५ प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध समाज प्रबोधन कार्यक्रम*

 *पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांचे ७५ प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध समाज प्रबोधन कार्यक्रम*



पंढरपूर: प्रतिनिधी 


कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालय व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानतून आष्टी (ता. मोहोळ) येथे राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत श्रमदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन शुक्रवार दिनांक २६ जानेवारी रोजी ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

  सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच आष्टी गावातील सर्व ग्रामस्थ नूतन विद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक शिक्षेकेतर कर्मचारी यावेळेस उपस्थित होते.  यामध्ये विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करण्यासाठी प्रयत्न केले,

यामध्ये पाच समाज प्रबोधन विषयावरती पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले

यामध्ये मुलगी शिकली प्रगती झाली, मतदार नोंदणी व मतदान जनजागृती, व्यसनमुक्ती गरज काळाची, सायबर सिक्युरिटी आणि आजचा वापर करता, बालविवाह हुंडाबळी व अमानूष अत्याचार या विषयावरती  पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली, यामध्ये पथनाट्याचे सूत्रधार म्हणून नागेंद्रकुमार नायकुडे यांनी सादरीकरण केले व मुलगी शिकली प्रगती झाली या पथनाट्यात अथर्व कुराडे, वैष्णवी कंडरे, तेजस्विनी खांडेकर यांनी सादरीकरण केले व मतदान जनजागृती या पथनाट्यात श्रद्धा पंधे,राशीत पठाण यांनी सादरीकरण केले त्याचबरोबर व्यसनमुक्ती या पथनाट्यात नाना वाघमारे, सत्यम खापले यांनी सादरीकरण केले त्याचबरोबर सायबर सिक्युरिटी या पथनाट्यात राहुल माळी, प्रातिमा जानकर यांनी सादरीकरण केले तसेच बालविवाह व हुंडा पद्धती या पटनाथ्यात  किशोर नरळे,प्राजक्ता डोंबरे, मानसी शिंदे, यांनी सादरीकरण केले. यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. चंद्रकांत देशमुख, प्रा. सुमित इंगोले,  रासेयो समन्वयक प्रा. अर्जुन मासाळ, प्रा. अजित करांडे, प्रा. सिद्धेश्वर गंगोंडा, यासह एनएसएस क्लब प्रेसिडेंट नागेंद्रकुमार नायकुडे, सेक्रेटरी अथर्व कुराडे विभागीय विद्यार्थी प्रतिनिधी नाना वाघमारे, के. टी. नरळे, ए .ए. चौगुले, एस. के. पांधे, ए. बी. नायकल, पी. एम. रुपनर, टी. एस. खाांडेकर, सी. एल. मासाळ, एस. डी. आसबे,आर. एम .पठाण, एस. पी. कापले, व्ही. व्ही. कंडरे, एच. एच. शिंदे, एस. व्ही. अवताडे, ऐ.एस.कवडे, व्ही.पी.पडळकर, पी. डी. देवराम, एस. ए. भिवरे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व ग्रामपंचायत आष्टीसह ग्रामस्थ परीश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad