*पंढरपूर सिंहगडचे प्रा. सुभाष पिंगळे यांना पीएच डी प्रदान*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयातील कॉम्पुटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेले प्रा. सुभाष विठ्ठल पिंगळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल युनिवरर्सिटी (स्टेट युनि्वरर्सिटी) मधुन पीएच. डी. प्राप्त केली असल्याची माहिती प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल युनिवरर्सिटी
येथे "इंटरयुजन डिटेक्शन सिस्टम" या विषयावर प्रा. सुभाष विठ्ठल पिंगळे यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर सायन्स सायटेशन इंडेक्स एक्सपांडेड मध्ये २ व स्कोपसमध्ये १ असे ३ जर्नल आर्टिकल व २ कॉन्फरन्स आर्टिकल प्रसिद्ध झाले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल युनिवरर्सिटी चे माहिती तंत्रज्ञान विभागाचे विभाग प्रमुख व तसेच प्राध्यापक डॉ. संजय सुतार यांनी या प्रबंधासाठी मार्गदर्शन केले.
प्रा. सुभाष विठ्ठल पिंगळे यांनी पीएच डी प्राप्त केल्याबद्दल पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, कॉम्पुटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचे प्रा.नामदेव सावंत , प्रा. सुमित इंगोले, प्रा. बाळकृष्ण जगदाळे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचाऱ्यांनी तसेच सर्व विद्यार्थीनी अभिनंदन केले.