पंढरपुर सिंहगड मध्ये "विकसित भारत २०४७" अभियान

 *पंढरपुर सिंहगड मध्ये "विकसित भारत २०४७" अभियान*





पंढरपूर: प्रतिनिधी


एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली "विकसित भारत २०४७" या अभियानाचे प्रधानमंञी नरेंद्र मोदी यांचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण मध्ये सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे विद्यार्थी सहभागी होऊन याचा 

अभियानाचा लाभ घेतला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

   देशासाठी राष्ट्रीय योजना, प्राधान्यक्रम आणि उद्दिष्टे तयार करण्यात तरुण पिढीला सक्रियपणे सहभागी करून घेण्याचे पंतप्रधान मोदींचे ध्येय आहे. या व्हिजनच्या अनुषंगाने, "डेव्हलपमेंट इंडिया ॲट १९४७ व्हाईस ऑफ युथ" हा उपक्रम देशातील तरुणांना विकसित भारताच्या संकल्पनेत योगदान देण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देईल, असं नरेंद्र मोदी म्हणाले होते. तसेच विकसित भारत ॲट २०४७चे उद्दिष्ट आहे की भारताला २०४७ पर्यंत, त्याच्या स्वातंत्र्याचे १०० वे वर्ष एक विकसित राष्ट्र बनवायचे आहे, असंही नरेंद्र मोदींनी यांनी नमूद केले होते. याच अनुषंगाने पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहानाल साथ देत ऑनलाईन प्रक्षेपणाच्या सहभागी होऊन लाभ घेतला. 

  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील प्रा. धनंजय गिराम यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad