आमदार आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत हात व पाय शिबिरासाठी लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद
प्रतिनिधी - पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून साधू वासवानी पुणे यांच्या सहकार्याने पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत कृत्रिम हात व पाय शिबिरासाठी मतदार संघातील लाभार्थी बंधू-भगिनींनी मोठा प्रतिसाद नोंदवला आहे. सदर शिबिराचे उद्घाटन पंढरपूरचे प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ अवताडे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न करण्यात आले.
या शिबिरामध्ये जवळपास ३८४ इतक्या लाभार्थ्यांनी आपल्या अवयवाची तपासणी करून आवश्यक अवयवासाठी मोजमाप संबंधित संस्थेकडे दिले आहे. यावेळी प्रांताधिकारी गुरव यांनी सांगितले की, आमदार समाधान आवताडे यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या मंडळींनी त्यांच्या वाढदिवसावर अनावश्यक खर्च न करता या लाभार्थी बंधू-भगिनींसाठी आपल्या संवेदनशील भावनेने या शिबिराचे आयोजन करून आमदार आवताडे यांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने शुभेच्छा देण्याचा मानस ठेवला आणि त्यांनी या उपक्रमातून तो पूर्ण केला आहे. समाजातील अशा घटकांना जगण्याची उमेद निर्माण करून देण्यासाठी अशा विधायक उपक्रमांची नितांत गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
या कार्यक्रमासाठी माजी उपसभापती विजयसिंह देशमुख, माजी संचालक द्रोणाचार्य हाके, माजी नगरसेवक सुनिल डोंबे, डी. राज सर्वगोड, मोहन आप्पा बागल, संतोष पवार,राजेंद्र हुंडेकरी संदीप जी माने, अर्जुन जी चव्हाण, शांतिनाथ बागल, दत्तात्रय कोळेकर, शरीफ भाई शेख, नाना हाके श्री विनोदराज लटके, बापूसाहेब कदम प्रसाद भैया कळसे, बाळासाहेब खपाले, समाधान देठे, धनाजी जाधव, शहाजी कांबळे, गोवर्धन देठे, भाऊ भोसले, पांडुरंग शिंदे , तुकाराम आबा कुरे, दत्ताआबा रोंगे पाटील, तात्या जगताप, पांडुरंग करकमकर धीरज म्हमाने पीराजी धोत्रे, अमोल धोत्रे,सुमित खटावकर, सतीश आप्पा गांडुळे, दीपक येळे,भास्कर घायाळ, अनिकेत देशमुख, संदीप आबा पाटील,शब्बीर इनामदार, शेखर भोसले, संतोष डोंगरे, पांडुरंग वाडेकर राहुल गावडे, भाऊसाहेब शिंदे नाईक, समाधान घायाळ, बापूसो गोडसे,हनुमंत ताटे,महेश चव्हाण, संजय माळी, भीमा आबा भुसे, परमेश्वर पाटील,किसन पवार,दादा मोरे मेंबर आतिक मुलानी, कृष्ण कवडे,दत्ता शिंदे,उमेश वाघमारे, दादासो घायाळ बिबीशन बोरगावे अभिजीत माने श्री.नितीन धोत्रे, प्राजक्ता बेणारे, जयश्री क्षीरसागर ज्योती कुलकर्णी ....... यांचेसह इतर मान्यवर व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये रक्तदान शिबिर,वृक्षारोपण, मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मतदारसंघातील पशूंची आरोग्य तपासणी, गरजूंना ब्लॅंकेट वाटप, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, वृद्धाश्रमामध्ये वृद्ध माता-पित्यांना मिष्टान्न भोजन व फळे वाटप, गोपाळनाथ गोशाळा गोपाळपूर येथे गाईंना चारा वाटप आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.