पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी १कोटी १४ लाख निधी मंजूर - आ. आवताडे

 पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील  विविध विकासकामांसाठी १कोटी १४ लाख निधी मंजूर - आ. आवताडे



प्रतिनिधी -


सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये २५१५ - १२३८ या योजनेअंतर्गत ग्रामविकास व पंचायत राज विकास विभागाकडे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी निधीची मागणी केली असता मतदारसंघातील  कामांसाठी शासन अध्यादेशाद्वारे १कोटी १४ लाख निधीला मंजूरी मिळाली असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे.


आमदार आवताडे यांनी सांगितले आहे की, पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या ग्रामीण भागातील विविध विकास कामांसाठी आपण २५१५ - १२३८ योजनेअंतर्गत निधीची मागणी केली होती. सदर मागणीला राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, ना.अजितदादा पवार, राज्याचे मंत्री तथा सोलापूर जिल्हा  पालकमंत्री ना.चंद्रकांत दादा पाटील, ना.गिरीष महाजन, खा.डॉ जयसिद्धेश्वर महास्वामी व संबंधित खात्याचे अधिकारी यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाला आहे. मंजूर झालेल्या या निधीतून मतदारसंघाच्या ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये सभामंडप बांधणे, तालीम बांधणे, रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करणे, ग्रामपंचायत कार्यालय बांधणे, स्मशानभूमी बांधणे, रस्ता खडीकरण व मुरमीकरण करणे, सामाजिक सभागृह बांधणे, भूमिगत गटार बांधणे, पेव्हिंग ब्लॉक बसवणे इत्यादी विकास कामे मार्गी लागणार आहेत.


या योजनेतून पंढरपूर तालुक्यातील गावांची व मंजूर झालेल्या विकास कामांची यादी पुढीलप्रमाणे - सिद्धेवाडी येथील साहेबराव जाधव ते विनोद जाधव वस्तीपर्यंत रस्ता सुधारणा करणे ५ लाख, शिरढोण येथील रा मा ९६५ ते ग्रा मा १२२ मार्गावरील रस्ता मुरमीकरण वर खडीकरण करणे १० लाख, बोहाळी येथे ग्रामपंचायत जागेत व्यायामशाळा बांधणे २० लाख, कौठाळी येथे पंचगंगा लवटे वस्ती ते जिल्हा परिषद शाळा इनामदार वस्ती येथे पेव्हिंग ब्लॉक बसवणे १० लाख, अनवली येथे स्मशानभूमी कडे जाणारा रस्ता सुधारणा करणे ५ लाख.


मंगळवेढा तालुक्यातील गावांची व विकास कामांची यादी पुढीलप्रमाणे -धर्मगांव येथील शहाणे वस्ती, टकले वस्ती रस्ता सुधारणा करणे ५ लाख, आसबेवाडी महादेव नागणे वस्ती ते भास्कर शिंदे वस्ती रस्ता सुधारणा करणे ५ लाख, कचरेवाडी येथील चौकातील कट्ट्याजवळ सभामंडप उभा करणे ७ लाख, मल्लेवाडी येथील चौगुले वस्ती - बनकर वस्ती ते विकास माळी शेत जाणारा रस्ता सुधारणा करणे ५ लाख, बठाण येथील दगडू मदने ते राजू बेदरे वस्ती पर्यंत रस्ता सुधारणा करणे ५ लाख, सलगर बु येथे भुयार रोड वरून तानाजी जाधव वस्तीपर्यंत रस्ता सुधारणा करणे ५ लाख, डोणज येथील वाघमुख्या देवस्थान येथे पत्र्याचा शेड उभा करणे ७ लाख, येळगी येथील गावांतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे ५ लाख, सोड्डी येथील सोड्डी ते बिराजदार वस्ती पर्यंत रस्ता सुधारणा करणे ५ लाख, अकोला येथील जगन्नाथ इंगळे वस्ती ते बुरांडे वस्ती मंगळवेढा शिव पर्यंत रस्ता सुधारणा करणे ५ लाख, रहाटेवाडी समाधान पवार सर घर ते प्रकाश आण्णा पवार चौक पर्यंत रस्ता सुधारणा करणे ५ लाख, गणेशवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालय ते काळा मारुती मार्गे अकोला रस्ता पर्यंत रस्ता सुधारणा करणे ५ लाख ही कामे केली जाणार आहेत.


सदर सर्व कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जाणार असून नियोजित कामांचा आराखडा तयार करून लवकरात लवकर कार्यारंभ आदेश देण्यात यावे अशा सूचना आमदार समाधान आवताडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. तसेच आपल्या गावातील मंजूर कामे सुरळीत व वेळेवर मार्गी लावण्यासाठी स्थानिक पातळीवरील राजकारण आड न आणता संबंधित ग्रामपंचायतींनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून आमदार जनसंपर्क कार्यालय पंढरपूर व मंगळवेढा येथे सादर करावीत असे आवाहन जनसंपर्क कार्यालय यांचेकडून करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad