स्वेरीच्या सुमारे १५० विद्यार्थ्यांनी रक्तदान करून २६/११ च्या हल्ल्यातील बळींना वाहिली श्रद्धांजली पंढरपूर पोलीस उपविभागीय कार्यालयातर्फे आयोजन


स्वेरीच्या सुमारे १५० विद्यार्थ्यांनी रक्तदान करून २६/११ च्या हल्ल्यातील बळींना वाहिली श्रद्धांजली

पंढरपूर पोलीस उपविभागीय कार्यालयातर्फे आयोजन



  पंढरपूर- २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक यांचे स्मरण व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून पोलीस उपविभागीय कार्यालय, पंढरपूर यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात स्वेरीच्या सुमारे १५० विद्यार्थी व प्राध्यापकांनी रक्तदान करून खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहिली. 

        २६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता. या हल्ल्यात मुंबई दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कामटे, एनकाउंटर स्पेशालिस्ट सुभाष साळसकर, वरिष्ठ पोलीस निरिक्षक शशांक शिंदे, एन.एस.जी. कमांडो अधिकारी मेजर संदीप उन्नीकृष्णन, मुंबई पोलीस दलातील सहाय्यक उपनिरिक्षक तुकाराम ओंबळे तसेच ३४ परदेशी नागरिकांसह कमीत कमी १९७ जण बळी पडले तर ८०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले. या घटनेचे स्मरण व शहिदांना श्रद्धांजली म्हणून पोलीस उपविभागीय कार्यालय, पंढरपूर यांच्या वतीने पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या शिबिरात स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार व विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.एम.एस. मठपती यांच्या सहकार्याने राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी व महाविद्यालयातील विभागीय समन्वयक यांच्या नेतृत्वाखाली स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या सुमारे १५० विद्यार्थ्यांनी पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये आयोजिलेल्या या रक्तदान शिबिरात सहभागी होवून स्वेच्छेने रक्तदान केले व दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या शूर वीरांना श्रद्धांजली वाहिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad