*पंडीत विनोद शेंडगे यांच्या हातून उत्तम संगीतकार घडावेत- डॉ. कैलाश करांडे*
पंढरपूर: प्रतिनिधी
इतरांच्या आयुष्यात नंदनवन फुलवण्याचे काम उत्तम संगीतकार करत असतात. माणसाच्या विविध मानसिक व शारीरिक आजारांवर संगीत हा उत्तम उपचार आहे. हाच उपचार पंढरपूर येथील पंडीत विनोद शेंडगे यांनी करून त्याच्या हातुन उत्तम संगीतकार घडावेत अशी भावना एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूरचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी सत्कार समारंभ प्रसंगी बोलताना व्यक्त केली.
पंढरपूर येथे गुरुवार दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ रोजी पंडीत विनोद शेंडगे यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सोलापूर येथील शिवरंजनी कला गौरव पुरस्काराने सन्मानित पंडीत विनोद शेंडगे याचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात डाॅ. कैलाश करांडे बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कलासाधना सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष, श्रीकांत बडवे महाजन होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना महाजन म्हणाले, पंडीत विनोद शेंडगे यांनी संगीत क्षेत्रात दिलेले योगदान हे खूप महत्वपूर्ण आहे. पंढरपूरात 'अनाहत' या पहिल्या ऑडिओ स्टुडिओची निर्मिती त्यांनी केली. तसेच बडोद्याला पं. नारायणराव विनायकराव पटवर्धन यांचेकडे गुरुगृही राहून गुरुकुल पध्दतीने संगीताची आराधना करून विशारद ही संगितातील महत्वपूर्ण पदवी प्राप्त करणारे विनोदी एकमेव पंढरीतील पंडीतजी आहेत.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश मोरे यांनी केले. यादरम्यान अमरसिंह चव्हाण, रणजीत मोरे, राजेंद्र माळी यांची समयोचित भाषणे झाली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ किरण बहिरवाडे, प्रा. राजेंद्र मोरे, अक्षय बडवे, राजकुमार शहा, राजकुमार आटकळे, महेश अंबिके, सचिन भिंगे, राहुल सिद्धेवाडकर, अभिजीत देशापांडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमास पंढरपूर येथील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.