*पंढरपूर सिंहगड मधील विद्यार्थ्यांकडून अनाथांना दिवाळी फराळ वाटप*
पंढरपूर: प्रतिनिधी
एक हात मदतीचा आनंदाचा सामाजिक बांधिलकीचा व आपल्या प्रेमाचा, जनसेवा हीच ईश्वर सेवा याच संकल्पनेतून या दिवाळीत सनात सामाजिक बांधिलकी व सामाजिक सलोखा अबादित राहावा म्हणून नवरंगे अनाथ बालकआश्रम आणि चंद्रभागा वाळवंट घाट पंढरपूर या ठिकाणी एकाकी अनाथ जीवन व्यतीत करणाऱ्या जीवांना एक मदतीचा हात यासाठी सर्वांनी माणसांमधली माणूसकी माणसांनीच जपली जावी आप-आपसातील आत्मीयता आपुलकीने टिकली जावी,
आलेल्या प्रत्येक संकटावर सहकार्यानं मात पाहिजे माणसांकडून माणसांसाठी मदतीचा सदैव हात पाहिजे म्हणूनच दिवाळी फराळ वाटप करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
यामध्ये एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी दिवाळी फराळाची ५ पाकीट करून घेऊन विविध ठिकाणी वाटप केले.
ज्यांना आर्थिक मदत शक्य होती त्यांनी आर्थिक मदत सुद्धा त्या ठिकाणी केली आहे. नवरंगे बालकाश्रम पंढरपूर आणि चंद्रभागा वाळवंट घाट पंढरपूर या ठिकाणी दिवाळी फराळ वाटप आणि खाऊ वाटप करण्यात आला आहे
एस.के.एन सिंहगड महाविद्यालय कोर्टी पंढरपूर मधून विद्युत विभागातील यिन महाविद्यालय अध्यक्ष यिन सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष आणि यिन वस्त्रोद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य नागेंद्रकुमार नायकुडे या समवेत यिन सदस्य अमर शिंदे, श्रीकांत जगताप, शुभम लोकरे, रोहित काळे, साईआनंद धट, रोहित देशमुख, उत्कर्ष कोळेकर यांसह महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी परीश्रम घेतले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य. डॉ. स्वानंद कुलकर्णी, यासह राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा. चंद्रकांत देशमुख प्रा. सुमित इंगोले या सह महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.