आवताडे शुगर कडून ऊस दराचा पहिला हप्ता २५५१ रुपये, कामगारांना ८.३३ % बोनस देणार- चेअरमन संजय आवताडे*

 *आवताडे शुगर कडून ऊस दराचा पहिला हप्ता २५५१ रुपये, कामगारांना ८.३३ % बोनस देणार- चेअरमन संजय आवताडे*



_*पहिल्या ११ साखर पोत्यांचे पुजन संपन्न*_


प्रतिनिधी :-

तालुक्यात सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या नंदुरच्या आवताडे शुगर अँण्ड डिस्टीलरीज प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्याने उसाचा दर जाहीर केला असून पहिला हप्ता २५५१ रुपये देणार असल्याचे कारखान्याचे चेअरमन संजय आवताडे यांनी जाहीर केले आहे. तर कामगारांना ८.३३% बोनस देणार असल्याचेही यावेळी चेअरमन संजय आवताडे यांनी सांगितले.

शुक्रवारी सकाळी कारखान्यावर चेअरमन संजय आवताडे यांच्या उपस्थितीत व कारखान्याचे टेक्निकल विभागाचे व्यवस्थापक सुहास शिनगारे व त्यांच्या पत्नी गौरी शिनगारे यांचे शुभहस्ते होमहवन व सत्यनारायण महापूजा करून डिस्टिलरी विभागाचा द्वितीय बॉयलर अग्नी प्रदीपन करण्यात आला. यावेळी मंगळवेढा मार्केट कमिटीचे माजी सभापती मा. सोमनाथ आवताडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मदास चटके, कार्यकारी संचालक मोहन पिसे, डिस्टिलरी मॅनेजर संभाजी फाळके, विजय माने, पंप्पु काकेकर, शाम पवार, चंदू गोडसे, गोपाळ पवार, श्रीकांत पवार, मोहन पवार, बजीरंग जाधव, राहुल नागणे, तोहीद शेख, डाॅ. जगताप, रमेश टाकणे, सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते


यावेळी बोलताना चेअरमन संजय आवताडे म्हणाले की, आमदार समाधान दादा आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली फॅबटेक समूहातून हा कारखाना खरेदी करून आवताडे शुगर मध्ये रूपांतरित केल्यानंतर पहिल्या गळीत हंगामामध्ये २३५० रुपये ऊस दर देत खाजगी कारखानदारी मध्ये सर्वाधिक दर दिला होता आम्ही हा कारखाना केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतला असून या कारखान्यामधून आम्ही कोणताही स्वार्थ ठेवला नाही गेल्या गळीत हंगामामध्ये कारखान्याचे सर्व कर्मचारी, ऊस पुरवठादार, ऊस वाहतूकदार, ऊसतोड मजूर व कारखाना प्रशासनाने मन लावून व प्रामाणिक काम केल्यामुळे गतवर्षीचा गळीत हंगाम यशस्वीरित्या पार पाडला यावेळीही असेच सहकार्य सर्व कर्मचारी, ऊस पुरवठादार, ऊस उत्पादक वाहतूकदार यांनी केले तर हाही गळीत हंगाम यशस्वीरित्या पार पाडून शेतकऱ्यांचे समाधान होईल असा जास्तीत जास्त दर शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न असणार आहे.

तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आपला ऊस आवताडे शुगर ला घालून सहकार्य करावे असे आवाहन चेअरमन संजय आवताडे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad