*पंढरपूर सिंहगड मध्ये "स्वसंरक्षण सह मिशन साहसी कार्यक्रम संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये शनिवार दिनांक २८ ऑक्टोबर २०२३ रोजी महाविद्यालयातील विद्यार्थिनी साठी "स्वसंरक्षण व मिशन साहसी" हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनी साठी आयोजित करण्यात आलेल्या "स्वसंरक्षण व मिशन साहसी" कार्यक्रमात अशोक भोसले व ऋषिकेश निंबाळकर यांचे स्वागत सावित्रीबाई फुले गर्ल्स फोरम च्या चेअरमन प्रा. अंजली पिसे व प्रा. अंजली चांदणे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
यावेळी अशोक भोसले व ऋषिकेश निंबाळकर यांनी महाविद्यालयातील विद्यार्थिनीना मार्गदर्शन करतना म्हणाले महिलांना कोणत्याही प्रसंगाला सामोरे जायचे, लढण्याचे सामर्थ्य मिळावे यासाठी "स्वसंरक्षण व साहसी मिशन" हा कार्यक्रम सिंहगड कॉलेज राबवत आहे. भविष्यात महिलांनी सक्षम होणे आवश्यक आहे. महिला वर होत असलेल्या अन्यायाचा व अत्याचाराला प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. याशिवाय स्वतःच स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सज्ज असणे आवश्यक आहे. यावेळी अशोक भोसले व ऋषिकेश निंबाळकर यांनी महिला स्वसंरक्षण याचे काही प्रात्यक्षिक करून घेतले.
या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सावित्रीबाई फुले गर्ल्स फोरम च्या चेअरमन प्रा. अंजली पिसे, प्रा. अंजली चांदणे, प्रा. सोनाली घोडके, प्रा. जयमाला हिप्परकर, प्रा. निकत खान यांच्या महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुञसंचालन ऋतुजा गायकवाड यांनी केले तर उपस्थितांचे आभार दिया जाधव यांनी केले.