ऊस दर स्पर्धेत भीमा दोन पाऊल पुढं.. चेअरमन विश्वराज महाडिक यांची २५२५ रुपये उचल देण्याची घोषणा* *भीमा प्रति टन २४०० नव्हे तर २५२५ रुपये पहिली उचल देणार - चेअरमन विश्वराज महाडिक* *ऊस दर स्पर्धा रंगात.. भीमाचा काटा चोख पेमेंट रोख.. २५२५ रुपये पहिली उचल देणार - चेअरमन विश्वराज महाडिक*

 *ऊस दर स्पर्धेत भीमा दोन पाऊल पुढं.. चेअरमन विश्वराज महाडिक यांची २५२५ रुपये उचल देण्याची घोषणा*


*भीमा प्रति टन २४०० नव्हे तर २५२५ रुपये पहिली उचल देणार - चेअरमन विश्वराज महाडिक*


*ऊस दर स्पर्धा रंगात.. भीमाचा काटा चोख पेमेंट रोख.. २५२५ रुपये पहिली उचल देणार - चेअरमन विश्वराज महाडिक*



*प्रतिनिधी - टाकळी सिकंदर:*

सोलापूर जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फोडणाऱ्या भीमा सहकारी साखर कारखान्याकडून या वर्षीच्या हंगामात गाळपास येणाऱ्या ऊसासाठी २४०० ऐवजी सुधारित २५२५ रुपये प्रति टन पहिली उचल देण्यात येणार असल्याची माहिती चेअरमन विश्वराज महाडिक यांनी पत्रकार परिषदेत घेत दिली. राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी गाळप शुभारंभ कार्यक्रमात यावर्षीची पहिली उचल जाहीर करत गाळप झालेल्या ऊसाचे पेमेंट ५ व्याच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार असल्याची घोषणा केली होती. भीमाने ऊस दराची कोंडी फोडल्यानंतर संभाव्य साखर विक्री दर वाढ आणि यावर्षीचा लहान हंगाम डोळ्यासमोर ठेवत जिल्ह्यातील इतर कारखान्यांनी आपली उचल जाहीर करत स्पर्धा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु केला. शनिवारी पत्रकार परिषद घेत चेअरमन विश्वराज महाडिक यांनी यावर्षीच्या ऊसासाठी सुधारित २५२५ रुपये पहिली उचल जाहीर करून दराच्या स्पर्धेत भीमा दोन पाऊल पुढे असल्याचे सिद्ध केले आहे.


दरम्यान वजन काटा चोख असल्याने कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचा भीमालाच ऊस घालण्याकडे कल असतो. केवळ काटा चोख असल्याने भीमाला ऊस घातल्याने प्रति टन १५० ते २५० रुपयांचा फायदा होतो असा सूर शेतकऱ्यांमधून नेहमीच ऐकायला मिळत असतो. काट्यामुळे फायदा होत असूनही उशिरा बिल मिळत असल्याने शेतकऱ्यांची होत असलेली अडचण ओळखत चेअरमन विश्वराज महाडिक यांनी यावर्षी येणाऱ्या ऊसाचे पेमेंट ५ व्याच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार असल्याची घोषणा केली. ऊस दराच्या स्पर्धेत भीमा मागे पडेल वाटत असतानाच विश्वराज महाडिक यांनी सुधारित उचल जाहीर करून हम भी किसीसे कम नहीं असा विश्वास सभासदांना दिला आहे. इतर कारखान्यांप्रमाणे इथेनॉल आणि डिस्टिलरी प्रकल्प नसताना केवळ साखर आणि को-जनरेशन प्रकल्पातून मिळणाऱ्या उत्पन्नातून भीमाने आजवर सर्वांच्या बरोबरीने दर दिला आहे. येत्या काळात हे दोन्ही प्रकल्प पूर्ण करून जिल्ह्यात एक नंबरचा दर देण्याचा प्रयत्नशील आहे असा निश्चय चेअरमन विश्वराज महाडिक यांनी बोलून दाखविला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad