*पंढरपूर सिंहगड मध्ये "हाऊ टू रजिस्टर फॉर कंपनी" या विषयावर व्याख्यान संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेल्या सर्व विभागातील विद्यार्थ्यांसाठी "हाऊ टू रजिस्टर फॉर" या कंपनीचे सेक्रेटरी तुकाराम चिंचणीकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानाच्या सुरुवातीस उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांच्या हस्ते तुकाराम चिंचणीकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना तुकाराम चिंचणीकर यांनी अनेक प्रकारच्या कंपनीचे विविध एरिया याबद्दल विस्तृत माहिती दिली. वेगवेगळ्या प्रकारच्या वन पर्सन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, पब्लिक लिमिटेड कंपनी, स्टॅच्युटरी कंपनी, निधी कंपनी आणि वेगळ्या कंपन्यांची त्याबद्दलची विस्तृत माहिती दिली. या सर्व कंपन्यांच्या रजिस्ट्रेशनची प्रक्रिया व केंद्र सरकारचे कायदे त्या कंपनीची ग्राहकाबद्दल असलेली बांधिलकी समजावून सांगितली.
महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील विद्यार्थिनी अलीना इनामदार व संदीप क्षीरसागर यांनी कार्यक्रमाचे सुञसंचालन केले तर या व्याख्यान उपस्थित मान्यवरांचे डॉ. अतुल आराध्ये यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व विभागाचे आय आय सी कॉर्डिनेटर तसेच शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.