"होवुद्या चर्चा" अभियानातुन शिवसेनेची मोदी सरकार विरोधात जनजागृती..
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संपुर्ण राज्यभरात गावोगावी "होऊ द्या चर्चा" अभियान सुरू आहे. याचाच एक भाग म्हणुन पंढरपूर तालुक्यातील गावांमध्ये शिवसेनेच्या पक्ष निरीक्षक चव्हाण पाटील व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी गावकर्यांसोबत बैठका सुरू केल्या आहे..
माढा लोकसभा मतदारसंघातील व्होळे,आजोती,पटवर्धन कुरोली, शेवते,करकंब,रोपळे,खरातवाडी बाभुळगाव येथे माढा लोकसभा निरीक्षक राहुल चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठका पार पडल्या..
यावेळी करकंब येथे आयोजित बैठकीत बोलताना श्री. चव्हाण पाटील म्हणाले की,गेल्या नऊ वर्षापासून केंद्रातील मोदी सरकार हे देशातील नव्हे तर त्यासोबत राज्यातील जनतेच्या भावनेशी खेळण्याचा आनंद घेत आहे.या सरकारने गेल्या नऊ वर्षात फक्त आश्वासनांचा पाऊस पडला जनतेला वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून वेठीस धरले त्यामुळे शिवसेनेने आता बोल घेवड्या सरकारच्या अपयशी ठरलेल्या योजना व जनतेला दिलेली खोटी आश्वासन याचा पर्दाफास करण्याचा ठरवले आहे..
पुढे बोलताना राहुल चव्हाण पाटील यांनी जनतेला विचारत, तुमच्या खात्यात 15 लाख रुपये आले का? दोन कोटी तरुणांना रोजगार मिळाला का? महागाई कमी होणार होती काय झालं? २०० स्मार्ट सिटी चे काय झालं? राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचे काय झाले रुग्ण मरत आहेत काय करताय आरोग्य मंत्री? हे राज्याला लाभलेले आरोग्य मंत्री नाही तर "कलंकित मंत्री" आहे. अशी टिका मोदी व मिदे यांच्या सरकारवर केली..
यावेळी बोलताना मा.उपतालुकाप्रमुख इंद्रजित गोरे म्हणाले की या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्राचे स्मारक केले नाही, बाबासाहेब आंबेडकरांचे इंदू मिल येथील स्मारक केले नाही, फक्त घोषणा केल्या अंमलात मात्र काही आणले गेले नाही त्यामुळेच हे लबाडांचे राज्य म्हणावे लागेल असे ते म्हणाले..
युवासेनेचे युवानेते रणजित बागल यावेळी बोलताना म्हणाले की देशात आणि राज्यात दररोज शेतकरी आत्महत्या होत आहे, तरूण बेरोजगार होत आहेत, महिला भगिनी सुरक्षित नाहीत,शेतीमालाला भाव नसताना खते बियाणे यांचे भाव मात्र गगनाला भिडलेले आहेत,कोरोनाकाळात उध्दवजी ठाकरे यांनी महाराष्ट्र उत्तमरीत्या संभाळला,आज मात्र दररोज नवजात बालके सरकारी आरोग्य व्यवस्थेच्या ढिसाळ कारभारामुळे दगावत आहेत, हे पाप सत्ताधाऱ्यांचेच आहे अशी खरमरीत टिका त्यांनी केली..यावेळी शिवसेना माढा विधानसभा प्रमुख उत्तम बारबोले, अभियान तालुका प्रमुख उमेश काळे,युवासेना उपजिल्हाप्रमुख आकाश माने, युवासेना तालुकाप्रमुख योगेश भैय्या चव्हाण, विभागप्रमुख बाळासाहेब पवार,विलास चव्हाण,गौसपाक आत्तार,बाळासाहेब पाटील,आफताब,डाॅ.अनिल क्षिरसागर,पिंटु गायकवाड,अजित शेवतकर आदि पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक गाव भेट दौरा ठिकाणी उपस्थित होते.